Ulhasnagar: सिंधुभवन नंतर मराठीभवनचा प्रश्न ऐरणीवर, उल्हासनगरात मराठी भवनसाठी भूखंडाची मनसेकडून मागणी
By सदानंद नाईक | Updated: August 4, 2023 18:31 IST2023-08-04T18:31:06+5:302023-08-04T18:31:40+5:30
Ulhasnagar: सिंधूभवनच्या धर्तीवर सुसज्ज मराठी भवन उभारण्याची मागणी मनसेचे माजी शहरजिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी करून, त्यासाठी भूखंड देण्याचे निवेदन आयुक्त अजीज शेख यांना दिले आहे.

Ulhasnagar: सिंधुभवन नंतर मराठीभवनचा प्रश्न ऐरणीवर, उल्हासनगरात मराठी भवनसाठी भूखंडाची मनसेकडून मागणी
- सदानंद नाईक
उल्हासनगर - सिंधूभवनच्या धर्तीवर सुसज्ज मराठी भवन उभारण्याची मागणी मनसेचे माजी शहरजिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी करून, त्यासाठी भूखंड देण्याचे निवेदन आयुक्त अजीज शेख यांना दिले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील सपना गार्डन शेजारी बांधण्यात आलेले सिंधूभवन उदघाटनाच्या प्रतिक्षेत असतांना, आमदार बालाजी किणीकर यांच्या पुढाकारातून कॅम्प नं-५, तहसील कार्यालय शेजारी दुसरे सिंधू भवन उभे राहण्याची शक्यता उभी ठाकली. सिंधूभवनसाठी जागेची पाहणी नुकतीच करण्यात आली असून त्यासाठी ५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. सिंधी समाजाच्या खालोखाल मराठी समाज मोठ्या संख्येने असतांना, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी परंपरा जपता येतील. यासाठी मराठी भवनची मागणी मनसेचे माजी शहरजिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली. मराठी भवनसाठी भूखंड उपलब्ध करून देण्याचे निवेदन आयुक्त अजीज शेख यांच्याकडे दिले आहे.
शहरात सिंधूभवन प्रमाणे मराठी भवन उभे राहण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती बंडू देशमुख व संजय घुगे यांनी दिली आहे. मराठी भवनसाठी निधी उपलब्ध करून दयावा. यासाठी स्थानिक आमदार व खासदार यांनाही निवेदन देणार असल्याचे देशमुख म्हणाले. मध्यंतरी उतार भारतीय भवनसाठी मागणी झाली असून त्यासाठी निधी देण्याची तयारी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिली होती.