शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीनंतर पोलिसांनी वेळ आणि पैशाचे योग्य नियोजन करावे- डॉ.शिवाजी राठोड

By जितेंद्र कालेकर | Updated: December 31, 2018 22:40 IST

ठाणे ग्रामीण पोलीस दलातून जमादार नथुराम हाटे, जगन्नाथ माने आणि पोलीस हवालदार अशोक आमरे हे तिघे ३१ डिसेंबर २०१८ रोजी पोलीस सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी या तिघांचाही सोमवारी सपत्नीक सत्कार केला.

ठळक मुद्देठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिला सल्लासेवानिवृत्त पोलिसांचा सत्कारनिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता

ठाणे: पोलीस कर्मचारी, अधिकारी यांनी निवृत्तीनंतर मिळणा-या पैशांचे तसेच उपलब्ध होणा-या वेळेचे योग्य नियोजन करायला हवे, असा वडिलकीचा सल्ला ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी सोमवारी निवृत्त पोलीस कर्मचा-यांना दिला. सेवानिवृत्तीनंतरही कोणतीही अडचण आल्यास त्यांनी पोलीस यंत्रणेशी कधीही संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले.जमादार नथुराम हाटे (मीरारोड पोलीस ठाणे, ३२ वर्ष पोलीस सेवा), जमादार जगन्नाथ माने (सुरक्षा शाखा, ठाणे ग्रामीण, ३७ वर्ष सेवा) आणि पोलीस हवालदार अशोक आमरे (मीरारोड , ३७ वर्ष सेवा) हे तिघे ३१ डिसेंबर २०१८ रोजी पोलीस सेवेतून निवृत्त झाले. यानिमित्त ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांच्या सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना डॉ. राठोड यांनी हा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, निवृत्तीनंतर पुढे आपल्याला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून घ्या. कुटूंबियांना आणि नातलगांना वेळ द्या. आरोग्याची काळजी घ्या. निवृत्तीनंतरच्या पैशाचे नियोजन करतांना स्वत:साठीही गुंतवणूक करा. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. समाजात आणि कुटुंबातही आपला ‘पोलिसी’ खाक्या दाखवू नका. आपला ताणतणाव घराबाहेरच ठेवा. मुलांना आणि कुटुंबियांना योग्य ठिकाणी सल्ला द्या. पण त्यांच्या वैयक्तिक जीवनात जास्त ढवळाढवळही करु नका. ज्यामुळे तुमची कोणाला अडचणही वाटणार नाही. आवडेल तिथे प्रवास करा, जीवनाचा आनंद घ्या, असे अनेक सल्ले देत सन्मानाने निवृत्तीचे जीवन जगा, असेही ते म्हणाले. यावेळी हाटे यांनीही मनोगत व्यक्त करीत पोलीस खात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. खाकी वर्दीच्या रुबाबामुळे एका आयएएस अधिका-याला कशी मदत केली, याचा अनुभव त्यांनी कथन केला. डॉ. आर. टी. राठोड यांच्या कार्यकाळात पोलीस भरती तर डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते होणारा निवृत्तीचा समारंभ हा एक दुर्मिळ योगायोग असल्याचे ते म्हणाले. अनेक वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून कुटूंब प्रमुखाप्रमाणे शिकायला मिळाले. समाजाचीही सेवा करता आली, हे सांगताना पोलीस खात्यातील अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी या तिन्ही कर्मचा-यांचा डॉ. राठोड यांच्याहस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि त्यांच्या सौभाग्यवतींसाठी साडी देऊन त्यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकPoliceपोलिस