शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

ठाण्यातील २९४ पोलीस विलगीकरणानंतर पुन्हा डयूटीवर झाले रुजू

By जितेंद्र कालेकर | Updated: May 27, 2020 20:42 IST

कोरोनाबाधित नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे पोलीस मुख्यालयासह अनेक पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकारी कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित झाले. आतापर्यंत १११ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून सात अधिकारी आणि ४२ कर्मचारी अशा ४९ पोलिसांनी कोरोनावर मात केली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील २९४ पोलीस देखिल विलगीकरणानंतर पुन्हा डयूटीवर झाले रुजू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १११ पोलिसांना कोरोनाची लागणसात अधिकारी आणि ४२ कर्मचारी अशा ४९ पोलिसांनी केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आतापर्यंत १४ अधिकाऱ्यांसह १११ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित पोलीस तसेच नागरिकांच्या संपर्कातील हायरिस्कमधील ४६ अधिकाऱ्यांसह २४८ कर्मचारी असे २९४ पोलीस मंगळवारपासून पुन्हा डयूटीवर रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनेकांनी कोरोनावर मात केल्यामुळे पोलिसांमध्ये दिलासादायक वातावरण आहे.कोरोनाबाधित नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे पोलीस मुख्यालयासह अनेक पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकारी कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित झाले. या कोरोनाबाधित पोलीस तसेच नागरिकांच्या संपर्कातील अनेक पोलिसांना घरातच तसेच केंद्रात विलगीकरणामध्ये रहावे लागल्यामुळे त्यांना काही काळ विश्रांती मिळाली होती. यातील बहुतांश जणांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यामुळे हे सर्वजण आता पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. * असे आहे संख्याबळठाणे पोलीस मुख्यालयात एका अधिका-यासह १०३, मुंब्रा पोलीस ठाण्यात १७ अधिका-यांसह ६९, वर्तकनगर तीन अधिका-यांसह ३० कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे २१ असे आतापर्यंंत २९४ पोलीस हे रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.* आतापर्यंत १४ अधिकारी आणि ९७ कर्मचारी अशा १११ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यात एका महिला कर्मचा-याचा मृत्यु झाला. तर सात अधिकारी आणि ४२ कर्मचारी अशा ४९ पोलिसांनी कोरोनावर मात केली. सध्या सात अधिकारी आणि ५४ कर्मचारी अशा ६१ जणांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.* पोलीस मुख्यालयात सर्वाधिक २२ त्यापाठोपाठ मुंब्रा १५ तर कळव्यात १२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्य राखीव दलासह शीघ्र कृती दलही कळवा, मुंब्रा आणि वागळे इस्टेट भागात तैनात केल्याने पोलिसांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस