शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

दबावानंतरही निघाला भव्य मोर्चा

By admin | Updated: June 21, 2016 01:20 IST

रस्ता रूंदीकरणाची कारवाई एकतर्फी सुरू असल्याचा आरोप करून वेगवेगळ््या संघटनांनी सोमवारी काढलेला मोर्चा निघू नये, यासाठी भाजपाने वेगवेगळ््या मार्गने दबाव आणला खरा

मीरा रोड/भाईंदर: रस्ता रूंदीकरणाची कारवाई एकतर्फी सुरू असल्याचा आरोप करून वेगवेगळ््या संघटनांनी सोमवारी काढलेला मोर्चा निघू नये, यासाठी भाजपाने वेगवेगळ््या मार्गने दबाव आणला खरा, पण त्यानंतरही मोर्चा निघाला. प्रमुख संघटना असलेल्या स्टिल असोसिएशनने आयत्यावेळी मोर्चातून माघार घेतली, तर मोर्चात सहभागी झालेल्या आपल्याच कार्यकर्त्याला मारहाण केल्याने भाजपाच्या गटनेत्याविरू्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य व्यापारी संघटनांसह रहिवासी संघाने भार्इंदरच्या गोडदेव नाक्यावरुन खारीगाव नाक्यापर्यंत मोर्चा काढत पालिकेच्या तोडफोड कारवाईचा निषेध केला. भाजपाकडून दबाव टाकला जात असतानाही पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील त्यात सहभागी झाले. मीरा-भार्इंदरमधील रस्ता रुंदीकरण मोहीम वादग्रस्त ठरली आहे. सत्ताधारी भाजपाच्या सहमतीने सुरु असलेल्या या रुंदीकरणात मनमानीपणे घरे, गाळे तोडले जात असल्याने असंतोष पसरला आहे. आधी मोबदला किंवा पर्यायी जागा न देताच कारवाई सुरू आहे. आदल्या दिवशी यायचे, लाल मार्किंग करुन जायचे आणि दुसऱ्या दिवशी बाऊन्सर, पोलीस आदी फौजफाट्यासह सरळ बांधकाम तोडायला यायचे अशी कार्यपध्दती पालिकेने अवलंबल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. फेरीवाले, हातगाडीवाले हटवून रस्ते-पदपथाचा अडथळा दूर करण्याऐवजी पालिका मात्र जुनी-राहती बांधकामे तोडत असल्याचा आरोप सातत्याने होत होता. त्यातच जुन्या औद्योगिक वसाहतींवरही हातोडा चालवण्यास घेतल्याने विविध व्यापारी संघटनांनी‘मिरा-भार्इंदर बचाव समिती’ स्थापन करत पालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. नागरिक, व्यापारी, अन्य संघटनांतील रोष पाहून धास्तावलेल्या प्रशासनासह भाजपाने मोर्चाच निघू नये, म्हणून मोर्चेबांधणी सुरु केली होती. आयुक्त अच्युत हांगे यांनी समितीला चर्चेसाठी पाचारण करुन ज्यांचे पूर्ण बांधकाम तोडले जाईल, त्यांना पर्यायी जागा देण्यासह मूळ जमीनमालकास टीडीआर देण्याआधी बाधितांची सहमती घेतली जाईल, असे लेखी पत्र दिले होते. ते मिळताच स्टेनलेस स्टिल मॅन्युफॅक्चरर अँण्ड ट्रेडर्स असोसिएशनने माघार घेतली. पण अन्य व्यापारी संघटनांनी मात्र मोर्चाचा पवित्रा घेतल्याने समितीत फूट पडली. गोडदेव नाक्यावरुन निघालेला जनआक्रोश मोर्चा खारीगाव नाक्यावर आल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले. विकासाला आमचा विरोध नाही. पण लोकांना मोबदला न देता किंवा पुनर्वसन न करात पालिकेने सुरु केलेली कारवाई बेकायदा, मनमानी असून टीडीआर माफियांच्या फायद्यासाठी सुरू असल्याचा आरोप मुझफ्फर हुसेन यांनी केला. हे शहर वसताना मी पाहिले असून दादागिरी करुन कोणी ते उद््ध्वस्त करत असेल, तर ते सहन करणार नाही, असा इशारा रोहिदास पाटील यांनी दिला. काँग्रेसचे माजी आ. मुझफ्फर हुसेन, गटनेते जुबेर इनामदार, माजी उपमहापौर नूरजहाँ हुसेन, भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुरेश खंडेलवाल, निर्भय भारतचे अंकुश मालुसुरे, कम्युनिस्ट पक्षाचे अ‍ॅड. किशोर सामंत, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर, भारिपचे अनील भगत आदींसह विविध व्यापारी संघटना मोर्चात उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)भाजपाची मोर्चेबांधणी हा मोर्चा निघू नये म्हणून भाजपा व प्रशासनाकडून मोर्चेबांधणी सुरु होती. भाजपाचे पदाधिकारी तसेच बफिंग असोसिएशनचे अध्यक्ष असलेले शैलेष पांडे मोर्चात फिरकलेच नाहीत. शिवसेनेच्या नगरसेवकांनादेखील भाजपा नगरसेवकांकडून मोर्चात सहभागी होऊ नये म्हणून फोन केले गेल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या स्टेनलेस स्टिल मॅन्युफॅक्चरर अँण्ड ट्रेडर्स असोसिएशनने माघार घेतली, त्याचे अध्यक्ष राजेंद्र मित्तलदेखील भाजपाचे पदाधिकारी आहेत. भाजपाचा कार्यकर्ता व रोहिदास पाटील यांचा समर्थक उत्तम पुरोहित हा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी थांबला असता भाजपाचेच गटनेते शरद पाटील यांनी त्यास मोर्चात सहभागी होऊ नको, असे बजावले. त्यावर पुरोहित यांनी परिचित व नातलगांचे नुकसान झाल्याने मोर्चात सहभागी होणार, असे सांगताच पाटील यांनी त्यास कानाखाली मारत शिवीगाळ आणि दमदाटी केली. मोर्चामध्ये उत्तम याने ही बाब भाषणात सांगितल्याने जमाव संतप्त झाला. सर्वांनी नवघर पोलीस ठाण्यावर मोर्चा वळवला. पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.