शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

तब्बल एका तपानंतर ठाण्यातील स्मार्ट मीटरचा मार्ग होणार मोकळा, स्मार्टसिटीतून ७० टक्के खर्च केला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:24 PM

अखेर एका तपानंतर ठाण्यातील स्मार्ट मीटरचा मार्ग मोकळा होत आहे. ठाणे महापालिका आता स्मार्ट सिटीतून ७० टक्के आणि ३० टक्के खर्च पालिका उचलणार आहे. यासाठी एकूण १०४.५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्मार्टसिटीतून भांडवली खर्च केला जाणार२४.७० कोटींचा निगा, देखभालीचा खर्च पालिका उचलणार

ठाणे - आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी आॅटोमेटीक मीटर अशा पध्दतीने मागील ११ वर्षे पालिका नळ संयोजनांवर मीटर बसविण्यासाठी विविध पध्दतीन निविदा काढत आहे. स्मार्ट मीटरची योजना फसल्याने पालिकेने सेमी आॅटोमेटीक मीटरची योजना पुढे आणली होती. सुरुवातीला पीपीपी तत्वावर पालिका ही योजना राबविणार होती. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने या योजनेचा तब्बल ७० टक्के खर्च पालिकेने उचलण्याची तयारी केली होती. परंतु तरीदेखील पालिकेला यामध्ये यश आले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीमधून भांडवली खर्च आणि उर्वरीत निगा, देखभालीचा पाच वर्षांसाठीचा खर्चाचा भार पालिका स्वत: उचलणार आहे. विशेष म्हणजे मीटरच्या खर्चाचा बोजा देखील पालिका स्वत: उचलणार असल्याने ठाणेकरांवरील हा बोजा आता हटणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.                    पाणी गळती आणि पाणी चोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी या उद्देशाने ठाणे महापालिकेने मीटर बसविण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपूर्वी पुढे आणला होता. त्यानुसार प्रथम हायटेक स्वरुपाचे परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसविण्याचे पालिकेने निश्चित केले होते. यासाठी ३५ कोटींचा निधी खर्च केला जाणार होता. परंतु तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव या योजनेविषयी साशंक होते. दरम्यान, राजीव यांची बदली होऊन त्यांच्या जागी आलेले आयुक्त असीम गुप्ता यांनी या योजनेचा गाशा गुंडाळला. मुंबईत एमआरए पध्दतीची मीटर बसविण्यासाठी अधिक पैसे खर्च लागले होते. परंतु बसविण्यात आलेले मीटर फारसे यशस्वी ठरले नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेचा हा अनुभव गाठीशी बांधत आयुक्तांनी ही योजनाच बंद केली.                 दरम्यान, पुन्हा ए.आर.एमचे सेमी आॅटोमेटीक मीटर बसविण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार आता या कामाच्या निविदा मागील वर्षी मागविण्यात आल्या होत्या. हे रोड मॉडेल पीपीपी तत्वावर राबविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यानुसार या निविदा अंतिम झाल्यानंतर साधारणपणे मार्च पर्यंत म्हणजेच नव्या वर्षात तब्बल १५ हजार ५०० नळसंयोजनावर हे मीटर बसविले जाणार होते. यासाठी १२.५० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. या योजनेच्या निविदेला वारंवार मुदतवाढ देऊनही, प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे यासाठीचा निधी स्मार्टसिटीतून मिळविण्यासाठी पालिकेने हालाचाली सुरु केल्या होत्या. त्यानुसार आता खºया अर्थाने स्मार्ट मीटरचा मार्ग मोकळा होणार असल्याचे दिसत आहे. स्मार्ट सिटीतून या कामाचा भांडवळी म्हणजेच ७९.८० कोटींचा खर्च केला जाणार आहे. तर २४.७० कोटींचा पाच वर्षांसाठीचा निगा, देखभाली, दुरुस्ती आणि परिचलनाचा खर्च पालिका स्वत:च्या तिजोरीतून करणार आहे. दुसरीकडे स्मार्टसिटीच्या बैठकीत या मीटरचा बोजा ठाणेकरांवर पडू नये असा निर्णय घेण्यात आला आहे. सुरवातीला, ठाणेकरांच्या खिशातून मीटरचे पैसे घेण्याचा विचार पालिकेने केला होता. परंतु आता त्याला मुठ माती देत पालिकेने आता ठाणेकरांवरील हा बोजा हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी