शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतर त्या मृताचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 20:36 IST

कुटुंबातील १६ जणांना पालिकेने केले क्वारंटाईन ... 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोना रिपोर्ट नसल्याने दाखल करून घेण्यास नकार दिल्याने उपचारांअभावी मृत्यू झालेल्या त्या मृताचा रिपोर्ट अखेर पॉझिटिव्ह आला असून त्याच्या पत्नीचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर आता पुढचे सोपस्कार पाळण्यासाठी ठाणे महापालिकेने  त्याच्या कुटुंबातील १६ जणांना क्वारंटाईन केले आहे. एखाद्या रुग्णाची ताब्यात अचानक बिघडल्यास रिपोर्ट येईपर्यंत हॉस्पिटल कोरोना रिपोर्ट शिवाय दाखलच करून घेत नसल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन बघत आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. 

        घोडबंदर भागातील एका व्यक्तीला मागील काही दिवस त्रास  सुरु होता. त्यामुळे त्याने 1 जुलै रोजी कोरोनाची चाचणी केली होती. परंतु जोर्पयत अहवाल येत नाही, तोर्पयत उपचार करता येणार नाहीत, असे त्याला सांगण्यात आले होते. याच कालावधीत शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती जास्त खालावली. त्यामुळे, त्याच्या नातेवाईंकानी आधी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी वाहनाची शोधाशोध सुरु केली. अहवाल आला असेल तरच अॅम्ब्युलेन्स दिली जाईल असेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे .त्यामुळे अखेर एका रिक्षावाल्याला विनंती केल्यानंतर  रिक्षावाला घेऊन जाण्यास तयार झाला होता. जवळ जवळ दोन तास शहरातील प्रतीथयश तीन ते चार रुग्णालयात त्याला दाखल करुन घेण्यासाठी नातेवाईकांनी विनंती केली होती . परंतु आधी कोरोनाचा अहवाल आणा मगच दाखल करु असे त्यांना सांगण्यात आले. अखेर  जिल्हा शासकीय रुग्णालयात  जाईपर्यंतच रुग्णाचा रिक्षातच तडफडून मृत्यु झाला. 

        या रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्याच्या रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आला आहे. तर पत्नी देखील पॉझिटिव्ह आली असल्याने कुटुंबातील इतर सदस्यांना मात्र क्वारंटाईन करण्याचे सोपस्कार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.  रुग्ण कोणत्याही रुग्णालयात गेल्यास त्यावर आधी उपचार करा असे पालिका प्रशासनाचे आदेश असताना या आदेशाची अंमलबजावणी मात्र कोणत्याही हॉस्पिटलकडून होत नसल्याने आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन बघणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस