शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महापौर चषकाच्या समारोपा नंतर मैदानात दारुची पार्टी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 22:37 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर चषकाच्या समारोपा नंतर सुभाषचंद्र बोस मैदानात झालेल्या दारु पार्टी वरुन पालिका व सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठु लागली आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर चषकाच्या समारोपा नंतर सुभाषचंद्र बोस मैदानात झालेल्या दारु पार्टी वरुन पालिका व सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठु लागली आहे. तर पार्टी नेमकी कोणी केली याचा तपा करण्यासाठी आयुक्तांनी पोलीसां कडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.एक कोटी रुपयांचा खर्च, राजकिय प्रसिध्दीसाठी मोठ्या प्रमाणात महापौरांची पालिकेच्या खर्चातुन बॅनरबाजी, शिवसेना - काँग्रेसने टाकलेला बहिष्कार, उद्घाटनाच्या कार्यक्रमास नागरीकांनी फिरवलेली पाठ , नियोजनाचा अभाव आदी अनेक कारणां मुळे महापौर चषक वादग्रस्त ठरला.त्यातच समारोपा च्या रवीवारी झालेल्या कार्यक्रमात मध्यरात्री नंतर देखील ध्वनीक्षेपकाचा वापर करुन ध्वनी प्रदुषण कायद्याचे पालिकेनेच उल्लंघन केले. हे कमी म्हणुन की काय. सकाळी मैदानात आलेल्या खेळाडुंना पालिकेच्या व्यासपीठावर दारुची पार्टी झाल्याचे आढळुन आले.मैदानात प्रवेश करताच पालिकेने बांधलेले बेकायदा पक्के व्यासपीठ असुन खोली तसेच स्वच्छतागृह आहे. त्याच स्टेज वर महापौर चषकाच्या फलका मागे कपड्याने बंदिस्त छोटी खोली तयार करण्यात आली होती. आत मध्ये महागड्या विदेशी ब्लॅक लेबल दारुची रीकामी बाटली, खोका तसेच बंदी असलेले प्लॅस्टीकचे ग्लास व कागदांचे ग्लास पडलेले होते. शिवाय पाण्याच्या रीकाम्या बाटल्या आणि जेवणाच्या पत्रावळ्या , उष्टं पडलेलं होतं. खुर्चीवर, खाली लादीवर आणि स्वच्छतागृहात ओकुन घाण करण्यात आली होती.अत्यंत गलिच्छ स्थिती व पालिकेच्या स्टेजवर झालेली दारुची पार्टी पाहुन सकाळी खेळायला आलेल्या खेळाडुं मध्ये देखील चर्चेचा विषय बनला. पालिकेचे कंत्राटी सुरक्षा रक्षक तसेच आरोग्य व वन विभागाचे कर्मचारी देखील हे पाहुन अवाक झाले. परंतु वरिष्ठांना कळवण्यासह पोलीसांना पाचारण न करता काही वेळाने सर्व उचलुन सफाई करण्यात आली. या प्रकाराने महापौर चषकावर टिकेची झोड उठली आहे.ध्रुवकिशोर पाटील ( नगरसेवक तथा सदस्य क्रिडा समिती ) - आम्ही रात्री साडेबारा वाजे पर्यंत मैदानात होतो. त्या नंतर काय झाले ते माहित नाही. कोणी नगरसेवक आदी असे करणार नाही. सुरक्षा रक्षक व संबंधित यांची जबाबदारी होती. सीसीटीव्ही तपासा. दोषींवर कारवाई झाली पाहिजे.बालाजी खतगावकर ( आयुक्त ) - या प्रकरणी पालिका भार्इंदर पोलीस ठाण्यात पत्र देऊन चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करेल. मैदानां मध्ये असे प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतली जाईल.रौफ कुरेशी ( नागरीक ) - पालिकेचा नव्हे तर भाजपाने हायजॅक केलेला हा चषक होता. यात पार्टी करणारे नगरसेवक आहेत का ? याचा शोध घेतला पाहिजे. मैदानाची जबाबदारी ज्यांची आहे त्यांच्यावर सुध्दा कारवाई झाली पाहिजे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर