अखेर अंबाडी येथील ग्रामसेवकाची चौकशी
By Admin | Updated: December 22, 2016 05:50 IST2016-12-22T05:50:36+5:302016-12-22T05:50:36+5:30
भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने शौचालय निधीवाटपात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. यामुळे

अखेर अंबाडी येथील ग्रामसेवकाची चौकशी
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने शौचालय निधीवाटपात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. यामुळे त्याच्या चौकशीचे आदेश निघूनही चौकशी होत नव्हती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच तातडीने या ग्रामसेवकाची चौकशी करण्यात आली.
अंबाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एन.ई. जाधव यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत शौचालयासाठी (स्वच्छतागृह) लाभार्थ्यांना मिळणाऱ्या रकमेचा त्यांच्या नावाने धनादेश काढून परस्पर त्याचा लाभ घेतला आणि लाभार्थ्यांना त्यातील एक दमडीही दिली नाही. याचबरोबर जाधव यांनी ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या नावे धनादेश काढून रकमेचा अपहार केल्याची
तक्र ार ग्राहक संरक्षण समितीच्या अनिल तरे यांनी जि.प.कडे २६ आॅक्टोबर रोजी केली होती. यावर जिल्हा परिषदेने ११ नोव्हेंबर रोजी भिवंडी गटविकास अधिकाऱ्यांना तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याला महिना उलटून गेला, तरी जाधव यांना पाठीशी घातले जात होते. याबाबत, १९ डिसेंबरला लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तत्काळ सूत्रे हलली आणि बुधवारी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी काळे यांनी जाधव यांची सखोल चौकशी केली. या चौकशीत या ग्रामसेवकावर ठपका ठेवला असल्याची माहिती तरे यांनी दिली. (वार्ताहर)