ठाणे : राज्यात गेल्या पाच वर्षांत राखीव जागांवरून स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेल्या परंतु त्यानंतर सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या कोल्हापुरातील १९ लोकप्रतिनिधींची पदे मागील महिन्यात रद्द झाल्यानंतर आता ठाणे महापालिकेनेसुद्धा न्यायालयाच्या या निर्णयाचा अभ्यास करून अखेर भाजपाच्या प्रभाग क्रमांक १५ अ च्या नगरसेविका सुवर्णा कांबळे यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे.सुवर्णा कांबळे उच्च न्यायालयात गेल्या असल्याने त्यांनी जात प्रमाणपत्र उशिराने सादर केले होते. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशावर सविस्तर चर्चा करून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कांबळे यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. यासंदर्भात सचिव अशोक बुरपुल्ले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे.
अखेर भाजपाच्या सुवर्णा कांबळे यांचे नगरसेवकपद रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 03:31 IST