शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आंदोलनानंतर तीन आमदारांसह भाजपा कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 14:38 IST

BJP News : ठाण्यातील १२ ठिकाणी झालेल्या वीज बिल होळी आंदोलनाला भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठाणे - ऐन लॉकडाऊनमध्ये लादण्यात आलेल्या वीज दरवाढीविरोधात सवलतीला नकार देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधातभाजपाने ठाण्यात जोरदार आंदोलन केले आहे. या जोरदार आंदोलनानंतर पोलिसांनी भाजपाच्या तीन आमदारांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, ठाण्यातील १२ ठिकाणी झालेल्या वीज बिल होळी आंदोलनाला भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाविकास आघाडी सरकारने लादलेली अवास्तव वीजबिले वसूल करण्याचे जाहीर करून जनतेचा विश्वासघात केल्याने सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून जनतेला सवलत देण्यासाठी भाग पाडण्यासाठी भाजपातर्फे आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्यानुसार ठाण्यातील महावितरणच्या वागळे इस्टेट येथील मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन झाले. या आंदोलनात भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार व प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, प्रदेश सचिव संदिप लेले, महिला आघाडीच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे, मंडल अध्यक्ष सुनील कोळपकर यांच्यासह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच वीज बिलाची होळी करण्यात आली. मात्र, आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी आमदारांसह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांच्या वाहनांमधून श्री नगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्यांची काही वेळानंतर सुटका करण्यात आली. दरम्यान, कोरोना आपत्तीच्या काळात महाविकास आघाडी सरकारने वीजबिलांच्या वाढीद्वारे सामान्यांवर दुसरी आपत्ती टाकली.

सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आवाज उठविल्यावर सवलत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता सवलत नाकारून जनतेला संकटात टाकण्यात आले, अशी टीका भाजपाच्या नेत्यांनी केली. राज्यातील समस्यांचे सर्व खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा रबर स्टॅम्प महाविकास आघाडी सरकारने तयार केला आहे. घरात बसणाऱ्या राज्य सरकारपर्यंत जनतेचा आक्रोश पोचत नाही, अशी टीका खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केली. तर वीज दरवाढीत सवलत न दिल्यास आगामी काळात ठाकरे सरकारची निश्चितच होळी होईल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. अवास्तव बिलांमुळे सामान्य नागरिक त्रासले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने दखल न घेतल्यास आगामी काळात नागरिकांचा संयम सुटेल, असा इशारा आमदार निरंजन डावखरे यांनी दिला.

 

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार