शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरे पाठोपाठ आता ठाण्यात मेट्रोसाठी रात्री वृक्षतोड; मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 09:41 IST

मनसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली; सध्या प्रशासनानं वृक्षतोड थांबवली

ठाणे: एकीकडे मुंबईत आरे कॉलनीत रात्री मेट्रो कारशेडसाठी झाडांची कत्तल करण्यात आल्यानंतर आता ठाण्यातही मध्यरात्री दोन वाजता मेट्रोच्या कामासाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी याठिकाणी धाव घेऊन ही कत्तल थांबवण्यासाठी प्रयत्न केला.मेट्रोच्या कामासाठी झाडांच्या केवळ छाटणीची परवानगी देण्यात आली होती. मात्र छाटणी न करता अचानक रात्री दोनच्या सुमारास या झाडांची कत्तल करण्यात आली, असा आरोप मनसेनं केला. याविषयीची माहिती मनसैनिकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वृक्षांची कत्तल थांबवली. वृक्षांची कत्तल करायची होती, तर ती विश्वासात घेऊन करणं अपेक्षित होतं. मेट्रो ही काळाची गरज आहे. मात्र अशा प्रकारे अंधाराचा फायदा घेऊन वृक्षांची कत्तल करणं योग्य असल्याची प्रतिक्रिया मनसेकडून व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. जवळजवळ पहाटे तीनपर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता. अखेर वृक्षतोडीचं काम थांबवण्यात आलं. आता यासंदर्भात महापालिका प्रशासन आणि संबंधित प्राधिकरण काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे या  झाडांची कत्तल केली जात असताना तिथे वनविभागाचा किंवा संबंधित विभागाचा अधिकारी उपस्थित असणं गरजेचं होतं. मात्र मध्यरात्री झाडांची कत्तल होत असताना एकही अधिकारी तिथे उपस्थित नव्हता. त्यामुळे घडलेला प्रकार चुकीचा असल्याचं मत मनसेनं व्यक्त केलं आहे. वृक्षतोडीसाठी धोरणं आखा आणि वृक्षांवर कुऱ्हाड चालवताना लोकांना विश्वासात घेण्याची मागणी या घटनेनंतर होऊ लागली आहे. 

टॅग्स :Metroमेट्रोAarey Coloneyआरे