अभिवाचन कार्यशाळेचा अनुभव मुलांना सर्वच क्षेत्रात उपयोगी पडणारा : सुरभी भावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST2021-02-23T05:00:13+5:302021-02-23T05:00:13+5:30
ठाणे : अभिवाचन कलेचा उपयोग फक्त सिने, नाट्यकला क्षेत्रातच नाही तर करिअरच्या कोणत्याही क्षेत्रात आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी करण्यासाठी, आपल्या ...

अभिवाचन कार्यशाळेचा अनुभव मुलांना सर्वच क्षेत्रात उपयोगी पडणारा : सुरभी भावे
ठाणे : अभिवाचन कलेचा उपयोग फक्त सिने, नाट्यकला क्षेत्रातच नाही तर करिअरच्या कोणत्याही क्षेत्रात आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी करण्यासाठी, आपल्या भावभावना अचूक व्यक्त करण्यासाठी होतो. या कलेचे प्रशिक्षण अशा कार्यशाळांमधून तुम्हाला या योग्य वयात होते आहे, ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे, असे प्रतिपादन टीव्ही कलाकार सुरभी भावे यांनी केले.
समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने मतकरी स्मृतिमालेच्या आठव्या पुष्पात लोकवस्तीतील युवकांसाठी प्रत्यक्ष भेटीतील अभिवाचन कार्यशाळा आयोजित केली होती. प्रसिद्ध कलाकार सुप्रिया विनोद यांनी या कार्यशाळेची रूपरेषा तयार केली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी होत्या. याप्रसंगी भावे पुढे म्हणाल्या की, तुमच्यासाठी वंचितांच्या रंगमंचाने नाट्यकलेच्या अनेक अंगांची दालने उघडून दाखवली आहेत. त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेणे हे तुमच्या हातात आहे. पण तुमचा उत्साह बघून मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच या संधीचे सोने कराल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत एकलव्य कार्यकर्ता दीपक वाडेकर आणि अक्षता दंडवते यांनी केले.
----------
फोटो मेलवर