शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी येथे आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचा स्लॅब निखळला; मुलगी गंभीर जखमी- प्रशासनास थांगपत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 17:50 IST

गंभीररित्या जखमी झालेली विद्यार्थीनी एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत असून तिचे नाव कांचन मोरे आहे. जव्हार तालुक्यातील चालतवड या गावातील कांचन ठाणे येथेबांदोडकर कॉलेजमध्ये एमएससीचे शिक्षण घेत आहे. या शैक्षणिक कालावधीत आदिवासी विभागाच्या वसतीगृहात ती वास्तव्याला आहे. मंगळवारी साडे बारा वाजेच्या सुमारास हा बाथरूमचा सॅबचा काही भाग निखळून पडला. दरम्यान मोरे हिच्या डोक्यावर काही तुकडे पडल्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली. रक्तबंबाळ अवस्थेत विद्यार्थिनींनी तिला सिव्हील रूग्णालयात त्वरीत दखल तिच्यावर उपचार केले.

ठळक मुद्देमुलींच्या वसतीगृहात स्लॅब निखळून एक विद्यार्थीनी गंभीर जखमीदुपारी घटना घडलेली असतानाही तिथे वसतीगृह अधिक्षकही उपस्थित नव्हते तीन वर्षापासून या इमारतीत वसतीगृह सुरू

ठाणे : येथील कोपरी येथे असलेल्या आदिवासी विकास विभागाच्य मुलींच्या वसतीगृहात स्लॅब निखळून एक विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. या विद्यार्थीनिवर येथील सिव्हील रूग्णालयात उपचार करण्यात आले. तिच्या डोक्याला जबर मार लागला असून डोके फूटले आहे. त्यातून रक्त स्त्राव झाला असून त्यावर उपचार करून तिला रूग्णालयातून वसतीगृहात पाठवण्यात आले आहे. दुपारी घटना घडलेली असतानाही तिथे वसतीगृह अधिक्षकही उपस्थित नव्हते तर वाचमेन, कर्मचारी आदी कोणासही या दुर्घनेची कल्पना देखील नाही.गंभीररित्या जखमी झालेली विद्यार्थीनी एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत असून तिचे नाव कांचन मोरे आहे. जव्हार तालुक्यातील चालतवड या गावातील कांचन ठाणे येथेबांदोडकर कॉलेजमध्ये एमएससीचे शिक्षण घेत आहे. या शैक्षणिक कालावधीत आदिवासी विभागाच्या वसतीगृहात ती वास्तव्याला आहे. मंगळवारी साडे बारा वाजेच्या सुमारास हा बाथरूमचा सॅबचा काही भाग निखळून पडला. दरम्यान मोरे हिच्या डोक्यावर काही तुकडे पडल्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली. रक्तबंबाळ अवस्थेत विद्यार्थिनींनी तिला सिव्हील रूग्णालयात त्वरीत दखल तिच्यावर उपचार केले. वसतीगृहात व रूग्णालयात देखील अधिक्षक, कर्मचारी आदीपैकी एकही या कालावधीत विद्यार्थीनींसोबत नव्हता.सुमारे ५० वर्ष जुन्या असलेल्या इमारतीमध्ये कोपरीत हे वसतीगृह कार्यरत आहे. जीर्ण झालेल्या या इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत. सॅब जीर्ण झाल्यामुळे निखळून पडत आहे. सुमारे २०१५ लाख देखील या इमारतीचा स्लॅब पडल्याची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. तरी देखील आदिवासी विभागाने तीन वर्षापासून या इमारतीत वसतीगृह सुरू केले आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर आदिवासी विकासविभागाचे हे मुलींचे वसतीगृह आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर ठाणे महानगरपालिकेची शाळा क्रमांक १६ भरते. या वसतीगृहात सुमारे ७४ विद्यार्थीनी वास्तव्यास आहे. मात्र त्यांच्यावर नियंत्रक असलेले अधिक्षक, वाचमेन, सिपाई आदी प्रशासकीय एकही कर्मचारी वसतीगृहाच्या कार्यालयात सायंकाळी ४ वाजेपर्यंतरीत एकही उपस्थित नव्हते. या संदर्भात अपर आयुक्त संजय मीना यांच्या निदर्शनात आणून देण्यात आली आहे. त्यांच्यावर सध्या निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.या वसतीगृहापासून काही अंतरावर असलेल्या वागळेइस्टेट येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात सायंकाळी सव्वाचार वाजेच्या दरम्यान संपर्क केला असता तेथे कोणीही उपस्थित नसल्याची गंभीरबाब उघकीस आली. त्यानंतर अपर आयुक्तांशी संपर्क साधण्यात आला. येथील प्रत्येक्ष चौकशी केल्यावर येथे अधिक्षक नसल्याचेही निदर्शनात आले. कर्मचारी देखील सायंकाळपर्यंत वसतीगृहात नसल्याची गंभीरबाब येथील विद्यार्थीनींशी चर्चा केली असता लक्षात आले. दुपारी रूग्णालया देखील एकही कर्मचारी, अधिक्षिक विद्यार्थीनींन सोबत नव्हता. अशी स्थिती असतानाही विभागीय कार्यालयाची जबाबदारी असलेले शेख यांनी वेळमारून नेण्यासाठी तेथे कर्मचारी उपस्थित असल्याची खोटी माहिती दिली. एवढेच नव्हे तर दुपारी विद्यार्थीनीला रूग्णालयात उपचारासाठी नेल्याचे दखील खोटी माहिती शेख यांनी देऊन प्रशासन सतर्क असल्याचे भासवले आहेत................फोटो - २६ ठाणे वसतीगृह सॅब

टॅग्स :thaneठाणे