शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

'दत्तक प्रक्रिया सुलभ होण्याची गरज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:55 IST

भिवंडीतून अपहरण झालेल्या आशिक हरजन या एक वर्षीय चिमुरड्याची अवघ्या आठ दिवसांत मोठ्या शिताफीने परराज्यातून सुखरूप सुटका केली आणि त्या अपहरणकर्त्याला जेरबंदही केले.

- पंकज रोडेकर भिवंडीतून अपहरण झालेल्या आशिक हरजन या एक वर्षीय चिमुरड्याची अवघ्या आठ दिवसांत मोठ्या शिताफीने परराज्यातून सुखरूप सुटका केली आणि त्या अपहरणकर्त्याला जेरबंदही केले. आशिकच्या सुटकेची धाडसी कामगिरी बजावणारे ठाणे शहर पोलीस दलातील भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्याशी साधलेला संवाद.......या गुन्ह्याचा शोध कसा लागला व त्यासाठी नेमके काय केले?हा गुन्हा दाखल झाल्यावर सुरुवातीला भिवंडीतील पद्मानगर येथे चौकशीला सुरूवात केली. त्यावेळी तेथील नागरिकांशी बोलताना काही जण गुन्हा घडला, त्याचदिवशी उत्तरप्रदेशला गेल्याचे समजले. त्यामध्ये एक मराठी तरुण असल्याने त्याच्यावर संशय बळावला. सीसीटीव्हीतील फुटेजमध्ये दिसणाऱ्या तरूणाचे हावभाव त्याच्याशी मिळते-जुळते असल्याने संशय वाढला. त्यातूनच हा गुन्हा उघडकीस आणण्यात यशस्वी ठरलो.आशिक उत्तर प्रदेशात असल्याने आरोपीला पकडण्यास स्थानिक पोलिसांचा कसा प्रतिसाद लाभला?या गुन्ह्यातील आरोपी आणि ते बाळ उत्तर प्रदेशात असल्याचे स्पष्ट झाल्यावर एका सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईक महिलेला तेथे पाठवले. त्यावेळी तेथील स्थानिक पोलिसांकडून चांगला प्रतिसाद लाभल्याने आशिकची सुटका आली आणि रोहित कोटेकर यालाही जेरबंद क रता आले.अपहरणाच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पालकांनी कशी काळजी घ्यावी?दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढत होताना आपण पाहत आहोत. पण, आपल्या चिमुरड्यांचे अपहरण होऊ नये, यासाठी पालकांनी त्याला एकटे सोडू नये. त्यांनी त्याला आपल्या नजरेआड करू नये. त्यामुळे पुढे होणाºया त्रासाला सामोरे जाण्याची वेळ ओढावणार नाही.कशामुळे हे प्रकार वाढले आहेत?या घटनांचा अभ्यास केल्यास हे प्रकार प्रामुख्याने मूलबाळ होत नसल्याने वाढल्याचे दिसत आहे. याबाबत ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना, आपल्याकडील दत्तक प्रक्रिया खूपच किचकट आहे. ज्यांना मुले होत नाही, ते मुले दत्तक घेण्यास आसुरलेले असतात. पण, या प्रक्रियेमुळे मूल घेता येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया काही प्रमाणात शिथिल होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले.एखादा हरवलेला चिमुरडा काही महिन्यांनी मिळाल्यावर त्याची ओळख कशी पुढे आणता?जर एखादे बालक हरवल्यानंतर मिळाल्यावर तो नेमका आहे का, यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे डीएनएचा. त्यामुळे आधारकार्ड किंवा अन्य पर्याय तूर्तास तरी ग्राह्य मानला जात नसल्याचे तपासात दिसते.