शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रशासकीय इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; मुख्यमंत्र्यांची तारीख मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 07:02 IST

विविध सरकारी कार्यालये येणार एकाच छताखाली, नागरिकांची सोय होणार

- सदानंद नाईक उल्हासनगर : विविध सरकारी कार्यालयांसाठी बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने उद्घाटन रखडल्याचे बोलले जात असून तहसील कार्यालयाच्या हस्तांतराचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.उल्हासनगरमधील नागरिकांच्या सुविधांसाठी विविध सरकारी कार्यालये एकाच प्रशासकीय इमारतीमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला आहे. कॅम्प नं-३ येथील पवई चौक व कॅम्प नं-५ मध्ये तहसील कार्यालयाच्या खुल्या जागेत प्रशासकीय इमारती उभ्या राहिल्या आहेत. कॅम्प नं-५ येथील इमारतीचे काम पूर्ण झाले असून उद्घाटनाला अडसर नको म्हणून इमारती बाहेरील रस्त्याजवळील ६५ टपऱ्यांवर पालिकेने दोन महिन्यांपूर्वी कारवाई केली. पवई चौकातील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाले असून अंतर्गत रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे. दोन्ही प्रशासकीय इमारतींसाठी १० कोटी खर्च आला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांची तारीख मिळत नसल्याने उद्घाटन लांबल्याची चर्चा रंगली आहे.पवई चौकात तळ अधिक एक मजला इमारत बांधण्यात आली असून तळमजल्यावर तहसील कार्यालय, तलाठी व सर्कल कार्यालय, सेतू व सहायक पोलीस आयुक्त कार्यालय असणार आहे. तर पहिल्या मजल्यावर उपविभागीय, उपकोषागार, प्रशासन, निवडणूक तसेच तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय असेल. तर कॅम्प नं-५ येथील तहसील कार्यालयाच्या खुल्या जागेवर उभ्या राहिलेल्या तळ अधिक तीन मजल्याच्या इमारतीत तळमजल्यावर वाहनतळ, असेल.पहिल्या मजल्यावर राज्य उत्पादन शुल्क, शिधावाटप, दुसऱ्या मजल्यावर सहायक दुयम निंबधक, नागरी संरक्षण, होमगार्ड व दुय्यम निबंधक कार्यालय असणार आहे. तर तिसºया मजल्यावर वजनमापे कार्यालय असणार आहे.तहसील कार्यालायवरून सुरू आहे खेचाखेचीतहसील कार्यालय जुन्याच ठिकाणी बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीत राहावे यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर आग्रही असून त्यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र पवई चौक येथे बांधलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कार्यालय दाखविण्यात आले असून त्याप्रमाणे सुविधा व बांधकाम केले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे