पाचपेक्षा कमी पट असलेल्या जि.प.च्या सहा शाळांचे समायोजन

By Admin | Updated: November 17, 2016 06:52 IST2016-11-17T06:52:56+5:302016-11-17T06:52:56+5:30

ठाणे जिल्हा परिषदेने ज्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ही पाच पेक्षा कमी असेल अशा सहा शाळांचे समायोजन तर, एकाच इमारतीत

Adjustment of ZP schools to less than five times | पाचपेक्षा कमी पट असलेल्या जि.प.च्या सहा शाळांचे समायोजन

पाचपेक्षा कमी पट असलेल्या जि.प.च्या सहा शाळांचे समायोजन

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेने ज्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ही पाच पेक्षा कमी असेल अशा सहा शाळांचे समायोजन तर, एकाच इमारतीत दोन वेगवेगळ्या भरण्यात येणाऱ्या पाच शाळांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच त्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या घरापासून जवळच्याच शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार असून त्या शाळेतील शिक्षकांचे देखील गरजेनुसार त्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार असल्याची जिल्हा परिषदेच्या सुत्रांनी दिली.
ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये एक हजार ३७३ शाळा आहेत. परंतु, पाच तालुक्यातील काही शाळांची पटसंख्या पाच पेक्षा कमी आहे. अशा शाळांमधील विद्यर्थ्यांचे समायोजन होत नव्हते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे समायोजन व्हावे या हेतूने पाच पटापेक्षा कमी असलेल्या सहा शाळांचे समायोजन जवळच्याच शाळांमध्ये करण्याचा निर्णय त्या - त्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. तसेच एकाच इमारतीत दोन वेगवेगळ्या शाळा एकाच वेळी भरत होत्या. त्यात दोन मुख्याध्यापकांसह एकाच विषयाच्या दोन - दोन शिक्षकांचे मनुष्यबळ देखील खर्ची पडत आहे. त्यामुळे अशा जिल्हा परिषदेच्या पाच शाळांचे एकित्रकरण करण्याचा निर्णय देखील शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. तसेच त्या शाळेतील शिक्षकांचे एकित्रकरण करण्यात आलेल्या शाळेत समायोजन करण्यात येणार असून अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे देखील दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Adjustment of ZP schools to less than five times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.