कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या ८८१ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST2021-03-25T04:39:15+5:302021-03-25T04:39:15+5:30

कल्याण: कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी तब्बल ८८१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान ...

Addition of 881 new corona patients in Kalyan-Dombivali | कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या ८८१ नव्या रुग्णांची भर

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या ८८१ नव्या रुग्णांची भर

कल्याण: कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी तब्बल ८८१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत ४९ रुग्णांना उपचाराअंती बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या रुग्णांची भर पडल्याने सद्यस्थितीला पाच हजार ९२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजमितीला कोरोनाबाधितांचा आकडा ७२ हजार ८८१ पर्यंत पोहोचला आहे. यातील ६५ हजार ६९० रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिमेत २७१ आणि डोंबिवली पूर्वेत २६३ तर कल्याण पूर्वेत १४९ नवे रुग्ण सापडले आहेत. डोंबिवली पश्चिमेतही १४४ रुग्ण आढळले असून मांडा टिटवाळा परिसरातही रुग्ण वाढू लागले असून बुधवारी ३८ नवे रुग्ण सापडले आहेत. मोहना आणि पिसवली भागात अनुक्रमे १५ आणि एक असे एकूण ८८१ नवे रुग्ण शहरात आढळले आहेत.

-----------------------------------------------

Web Title: Addition of 881 new corona patients in Kalyan-Dombivali