८८ कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST2021-07-07T04:50:16+5:302021-07-07T04:50:16+5:30

--------------------------------------------- भटक्या कुत्र्यांचा उपद्रव डोंबिवली : पूर्वेकडील गांधीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळेस कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे ...

Addition of 88 corona | ८८ कोरोनाबाधितांची भर

८८ कोरोनाबाधितांची भर

---------------------------------------------

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

डोंबिवली : पूर्वेकडील गांधीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळेस कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे शांतता भंग होत असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पाठीमागे धावण्याच्या त्यांच्या सवयीमुळे रस्त्यांवरून जाणाऱ्या दुचाकीधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी डॉ. आनंद हर्डीकर यांनी केडीएमसीकडे केली आहे.

------------------------------------------

बुलेट चोरी

कल्याण : पश्चिमेतील टिळकचौक, साईशक्ती अपार्टमेंटमध्ये राहणारे मंदार तांबे यांनी शुक्रवारी त्यांची बुलेट ते राहत असलेल्या इमारतीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

-----------------------------------

गावठी दारू हस्तगत

डोंबिवली : हेदुटणे आणि काटईगावात मानपाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत २,५९० रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी विकास म्हात्रे आणि भावेश पाटील यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------------------------

Web Title: Addition of 88 corona