४४ कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:46 IST2021-08-17T04:46:09+5:302021-08-17T04:46:09+5:30

------------------------------ आज २५ ठिकाणी लसीकरण कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सोमवारी २५ ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. यात कोविशिल्डचा ...

Addition of 44 corona | ४४ कोरोनाबाधितांची भर

४४ कोरोनाबाधितांची भर

------------------------------

आज २५ ठिकाणी लसीकरण

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सोमवारी २५ ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. यात कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. २५ केंद्रांपैकी कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवली पूर्वेतील सावित्रीबाई फुले कलामंदिर या ठिकाणी कोविशिल्डचा केवळ दुसरा डोस दिला जाणार आहे. उर्वरित ठिकाणी पहिला आणि दुसरा असे दोन्ही डोस दिले जाणार आहेत.

----------------------------------

१०३ वर्षांच्या आजीचा सन्मान

डोंबिवली : राज्यातील वेगवेगळ्या शहरांतील हवा उत्तम असताना डोंबिवली शहर हे पुन्हा सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे पर्यावरण अभ्यासकांच्या पाहणीत निदर्शनास आले आहे. हिरवा पाऊस, गुलाबी रस्ता असे प्रदूषण पाहणाऱ्या डोंबिवलीकरांनी आहार, व्यायाम याबाबतची पथ्ये पाळून वयाची सेंच्युरी पार केल्याचे विशेष वृत्त ‘लोकमत’मध्ये नुकतेच प्रकाशित झाले होते. यात १०३ वर्षे वयाच्या डोंबिवली पश्चिमेतील द्रौपदीबाई सखाराम म्हात्रे यांच्या आजवरच्या जीवनशैलीवर लिखाण केले होते. याची दखल घेत, रविवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्त्या काशिबाई जाधव आणि अन्य महिलांनी द्रौपदीबाई यांना फेटा बांधून पुष्पगुच्छ देत, त्यांचा विशेष सन्मान केला.

फोटो आहे

------------------------------------------

टेम्पोची धडक

कल्याण : अजय पवार यांच्या गाडीला भरधाव टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातात पवार यांच्यासह अन्य दोघे जखमी झाल्याची घटना वालधुनी येथे शुक्रवारी सकाळी ६.३० ला घडली. या प्रकरणी टेम्पो चालक गफारू शेख याच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------------------------

Web Title: Addition of 44 corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.