शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीला रिव्हॉल्व्हर दाखवून दिली धमकी: भूमीका देण्याच्या नावाखाली विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 23:58 IST

चित्रपटात दुय्यम मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली मीरा रोड येथील एका २३ वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग करीत कास्टींग काऊच करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कथित निर्माता राहूल तिवारी (३०, रा. गोरेगाव, मुंबई) याच्यासह चौघांना कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देमहिलेसह चौघाही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगीमनसेने केला होता पर्दाफाश

लोकमत न्युज नेटवर्कठाणे: चित्रपटात दुय्यम मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली मीरा रोड येथील एका २३ वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग करीत कास्टींग काऊच करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कथित निर्माता राहूल तिवारी (३०, रा. गोरेगाव, मुंबई) याच्यासह चौघांना कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. या चौघांनाही ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले ंआहेत.तिवारी तसेच बिरालाल यादव (३५, रा. कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे), राकेश यादव (३०, रा. गोरेगाव, मुंबई) आणि कांचन यादव (३०, रा. गोरेगाव, मुंबई) या चौघांनीही आपसात संगनमत करुन पिडित अभिनेत्रीला चित्रपटात मुख्य भूमीका देण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी तिला ठाण्यातील कासारवडवली भागात २९ जुलै रोजी सायंकाळी आणले होते. नंतर तिला लखनऊ येथून येणाºया निर्मात्यांना खुष करावे लागेल, असे तिवारी याने सांगितले. या निर्मात्यांना आॅफ स्क्रीन कॉम्प्रमाईज करावे लागेल, असेही त्याने सांगितले. नंतर सेकंड लीडचा रोल देतो, असे सांगून तिला विश्वासात घेतले. त्याच दरम्यान, तिला कारमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवित धमकी देऊन तिचा विनयभंग केला. दरम्यान, या प्रकाराची तिने आधीच कुटूंबीयांना कल्पना दिलेली असल्याने महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे पदमनाभ राणे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकाराचा भंडाभोड केला. या चौघांनाही मनसे ‘स्टाईल’ने प्रसाद दिल्यानंतर त्यांना कासारवडवली पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर या चौघांविरुद्ध विनयभंगासह धमकी देणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. यातील राहूल, बिरालाल आणि राकेश या तिघांना ३० जुलै रोजी पहाटे १ वाजता अटक झाली. तर त्यांची महिला साथीदार कांचन हिला सकाळी १०.३० वाजता पोलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. केसरे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग