कार्यकर्ते हातघाईवर
By Admin | Updated: October 30, 2015 23:58 IST2015-10-30T23:58:58+5:302015-10-30T23:58:58+5:30
भाजप महिला उमेदवाराच्या दिरावर कल्याणमध्ये प्राणघातक हल्ल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव ठाकुर्ली परिसरातील पक्षाचे

कार्यकर्ते हातघाईवर
कल्याण : भाजप महिला उमेदवाराच्या दिरावर कल्याणमध्ये प्राणघातक हल्ल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव ठाकुर्ली परिसरातील पक्षाचे कार्यालय बंद करून घरी परतत असलेल्या कृष्णकांत परुळेकर या भाजप कार्यकर्त्याचे आठ जणांनी अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी नऊ जनांना ताब्यात घेतले आहे. ही मारहाण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
दुसऱ्या घटनेत कल्याण पूर्वेकडील अपक्ष उमेदवाराला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत.