शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे मोबाइलमध्ये शूटिंग करणाऱ्यावर पोस्कोअंतर्गतही होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:07 IST

ठाण्याच्या ढोकाळी भागातील एका इमारतीमधील वेगवेगळया बाथरुमच्या बाहेरुन मोबाईलमध्ये अश्लील चित्रण करणाऱ्या अविनाश यादव याच्यावर आता पोस्को अंतर्गतही कारवाई केली जाणार आहे. त्याची जामीनावर मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाईची मागणी महिलांनी सोमवारी केली.

ठळक मुद्दे ठाण्याच्या ढोकाळीतील प्रकार कापूरबावडी पोलिसांची कारवाई कडक कारवाईची महिलांनी केली मागणी

ठाणे : ढोकाळी येथील एका इमारतीमधील वेगवेगळ्या बाथरूममधून महिला, पुरुष तसेच लहान मुलामुलींचे आपल्या मोबाइलमध्ये गुपचूप शूटिंग करणा-या अविनाश कुमार यादव (३४) या विकृताविरुद्ध पोस्कोअंतर्गतही कारवाई केली जाणार असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. त्याच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी सायंकाळी सोसायटीच्या ६० ते ७० महिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते.गेल्या काही दिवसांपासून इमारतीमधील काही महिला तसेच तरुणींच्या अंघोळीच्या तसेच इतर वेळी तो आपल्या मोबाइलमध्ये चित्रण करत असल्याची तक्रार एका महिलेने २३ फेब्रुवारी रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात केली. ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने त्याला अवघ्या १५ मिनिटांतच अटक केली. तो आयटी इंजिनीअर असून जून २०१८ मध्येच त्याचा विवाह झाला आहे. त्याचा मोबाइल आणि टॅब तपासणीसाठी जप्त करण्यात आला आहे. मात्र, लॅपटॉप त्याच्या पत्नीचा असल्यामुळे त्यातील पडताळणीनंतर तो तिला परत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला याच संदर्भातील १२ तक्रारी असल्या, तरी आतापर्यंत त्याच्याविरुद्ध ३५ ते ४० जणांनी तक्रारी केल्या आहेत. तो इमारतीच्या जिन्याजवळून बाथरूममध्ये मोबाइल ठेवून शूटिंग करत असल्याचे आढळले आहे. त्याची जामिनावर सुटका झाल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला. मात्र, तपासणी करताना लहान मुलामुलींचेही चित्रण आढळल्यामुळे त्याच्यावर पोस्कोअंतर्गतही कारवाई केली जाणार असल्याची ग्वाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिली. त्याची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्यानंतर रहिवासी शांत झाले. महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदा