लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी गेल्या चार दिवसांमध्ये ४१५ मद्यपी वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यापुढे केवळ दारू पिऊन वाहन चालवणार्यावरच नव्हे, तर सहप्रवाशांवरही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला. ३१ डिसेंबरच्या रात्री पीपीई किट घालून प्रत्येक वेळी वेगळे नोजल वापरून ही कारवाई केली जाणार आहे.थर्टी फस्टच्या रात्री दारू पिऊन वाहन चालविण्यामुळे अपघात होऊ नये, याकरिता ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरसह ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारून प्रत्येक वाहनचालकाची तपासणी केली जाणार आहे. केवळ मद्यपी वाहनचालकच नव्हे, तर वाहनांमधून प्रवास करणारे सहप्रवासीही मद्यपान करण्यास चालकाला प्रोत्साहित केल्यामुळे दोषी ठरतात. कोरोना संक्र मणाचा धोका अजूनही असल्याने मद्यपी चालकांविरु द्ध वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात नव्हती. श्वास विश्लेषकाच्या माध्यमातून तपासणी करणे शक्य नसल्यामुळे मद्यपी वाहनचालकांमध्ये बेदरकारपणा वाढला आहे. अनेक जण आपापल्या घरांमध्ये किंवा खासगी ठिकाणी पार्टी केल्यानंतर नववर्ष स्वागताचा जल्लोष साजरा करण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे अपघात आणि गैरप्रकार टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.* सहा महिने कैदेची शिक्षामोटारवाहन कायदा १९८८ च्या कलम १८५ नुसार मद्यपी वाहनचालकांना सहा महिने कैद किंवा दोन हजार रु पये दंड अशी शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा वारंवार केल्यास दोन वर्षे कारावास किंवा तीन हजार रु पये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. कलम १८८ मध्ये मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीला वाहन चालविण्यास उद्युक्त केल्याचा ठपका ठेवत सहप्रवाशांवरही कारवाई होऊ शकते. नववर्षात अशी कारवाई टाळण्यासाठी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.* ...तर कुटुंबीयांनाही दिली जाणार माहितीनाकाबंदीमध्ये १८ ते २५ वयोगटांतील तरु ण मद्यपी आढळल्यास त्यांच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली जाणार आहे.* ...तर मद्यच देऊ नयेराज्य उत्पादन शुल्क विभागाचा मद्य पिण्याचा परवाना नसलेल्या ग्राहकांना मद्य पुरवू नये. ग्राहक दारू प्यायला असेल, तर त्याला वाहन चालविण्यास प्रतिबंध करावा. वेळप्रसंगी त्यांना रिक्षा-टॅक्सी आदी वाहनांची व्यवस्था करून द्यावी. शक्य असल्यास त्यांच्या गाडीसाठी पर्यायी चालक उपलब्ध करून द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
मद्यपी चालकांमुळे सहप्रवाशांवरही होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:11 IST
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी गेल्या चार दिवसांमध्ये ४१५ मद्यपी वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यापुढे केवळ दारू पिऊन वाहन चालवणार्यावरच नव्हे, तर सहप्रवाशांवरही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला.
मद्यपी चालकांमुळे सहप्रवाशांवरही होणार कारवाई
ठळक मुद्देचार दिवसांमध्ये ४१५ मद्यपी वाहन चालकांवर कारवाईपीपीई सूट घालून पोलीस घेणार स्वत:चीही काळजी