मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:39 IST2021-04-06T04:39:49+5:302021-04-06T04:39:49+5:30

मुंब्रा : दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, तरीही मास्क न ...

Action on those who walk without a mask | मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई

मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई

मुंब्रा : दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, तरीही मास्क न वापरता व्यवसाय करणारे मुंब्र्यातील व्यापारी तसेच बाजारपेठांमध्ये फिरणाऱ्या नागरिकांवर सोमवारी ठामपणाने दंडात्मक कारवाई केली. त्यात मास्कचा वापर न करणाऱ्या ४५ जणांकडून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई रेल्वे स्टेशन परिसर, प्रमुख बाजारपेठ, आनंद कोळीवाडा, अमृतनगर, गुलाब पार्क बाजारपेठ आदी ठिकाणी करण्यात आल्याची माहिती मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सागर साळुंखे यांनी दिली.

Web Title: Action on those who walk without a mask