उल्हासनगरात अवैध बांधकामावर हातोडा; महापालिकेकडून पाडकाम कारवाई
By सदानंद नाईक | Updated: October 12, 2023 15:04 IST2023-10-12T15:04:21+5:302023-10-12T15:04:38+5:30
शहरात असंख्य अवैध बांधकाम सुरू असल्याचे आरोप प्रत्यारोप होत आहे.

उल्हासनगरात अवैध बांधकामावर हातोडा; महापालिकेकडून पाडकाम कारवाई
उल्हासनगर : कॅम्प नं-२, झुलेलाल मंदिर जवळील तीन मजली अवैध बांधकामावर अतिक्रमण प्रमुख गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पाडकाम कारवाई केली. अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई सुरच राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
उल्हासनगरातील अवैध बांधकामावर आरोप प्रत्यारोप होत असतांना कॅम्प नं-२ झुलेलाल मंदिर परिसरात उभे राहिलेले तीन मजली अवैध बांधकामाला सहायक आयुक्त जेठानंद करमचंदानी यांनी वारंवार नोटीस देऊनही, भूमाफियांने अवैध बांधकाम सुरू होते. अखेर...आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार बुधवारी अतिक्रमण प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली बांधकामावर पाडकाम कारवाई केली. यावेळी प्रभाग अधिकारी जेठानंद करमचंदानी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी शहरात सुरू असलेल्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याचे संकेत दिले. शहरात असंख्य अवैध बांधकाम सुरू असल्याचे आरोप प्रत्यारोप होत आहे.