नियम मोडणाऱ्या १५० वाहन चालकांवर मुंब्र्यात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:48 IST2021-09-17T04:48:13+5:302021-09-17T04:48:13+5:30

मुंब्रा : राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन चालकांसाठी निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्या मुंब्र्यातील वाहन चालकांवर ...

Action taken against 150 drivers for violating rules in Mumbra | नियम मोडणाऱ्या १५० वाहन चालकांवर मुंब्र्यात कारवाई

नियम मोडणाऱ्या १५० वाहन चालकांवर मुंब्र्यात कारवाई

मुंब्रा : राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन चालकांसाठी निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्या मुंब्र्यातील वाहन चालकांवर वाहतूक शाखा तसेच शहर पोलिसांनी विशेष मोहिमेअंतर्गत सलग दुसऱ्या दिवशी, गुरुवारीही कारवाई केली. या कारवाईमध्ये विना अनुज्ञप्ती (लायसन्स) वाहन चालविताना आढळून आलेल्या, तसेच कागदपत्रे जवळ न बाळगता वाहने चालविणाऱ्या, त्याचप्रमाणे विनाहेल्मेट, बॅच, तसेच रिक्षा चालविताना, विनागणवेश रिक्षा चालविताना आढळून आलेल्या आणि वाहने चालविताना कोरोनाच्या नियमांनुसार मास्कचा वापर न करणाऱ्या एकूण १५० वाहन चालकांवर ६७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी लोकमतला दिली.

Web Title: Action taken against 150 drivers for violating rules in Mumbra