शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

सांडपाण्यावर भाज्यांची लागवड करणाऱ्यांवर कारवाई करावी- नरेश म्हस्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 13:38 IST

आज महापौर नरेश म्हस्के यांनी ‍अतिरिक्त आयुक्त 1 यांच्या उपस्थितीत सर्व सहाय्यक आयुक्त व विविध विभागाची तातडीची बैठक घेतली.

ठाणे: रेल्वे ट्रॅकनजीकच्या जागेत तसेच ठाणे शहरातील विविध ठिकाणी भाजीचे मळे असून, या भाजीपाल्यांसाठी सांडपाणी मिश्रित अस्वच्छ पाणी वापरले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, यानुसार आज महापौर नरेश म्हस्के यांनी ‍अतिरिक्त आयुक्त 1 यांच्या उपस्थितीत सर्व सहाय्यक आयुक्त व विविध विभागाची तातडीची बैठक घेतली. दूषित पाणी वापरून भाज्यांची लागवड ठाणे शहरात ज्या ज्या  ठिकाणी होत आहे, त्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश ‍महापौरांनी ‍दिले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महापालिकेचे पहिले कर्तव्य असून, याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. तसेच याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही तक्रार केली असल्याचे महापौरांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेविका मालती पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 राजेंद्र अहिवर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगांवकर, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान तसेच सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. रेल्वे ट्रॅकजवळच्या मोकळ्या जागेत तसेच शहराच्या बहुतांश  ठिकाणी भाजीचे मळे आहेत, या ठिकाणी बोअरवेल असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र पिकांसाठी मलमूत्रमिश्रीत सांडपाणी तसेच गटाराचे पाणी देण्यात येते.मानवी मलमूत्र हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, असे असताना देखील याच सांडपाण्यावर अशा प्रकारे भाजीपाला पिकवून एक प्रकारे विविध रोग नागरिकांना दान स्वरुपात दिले जात आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ठाणे महापालिका क्षेत्राचा विचार केल्यास कळवा, मुंब्रा व दिवा तसेच ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या समतानगर, गांधीनगर,सिडको, मफतलाल कंपाऊंड, परिसरात भाजीमळे असून यातून पिकविलेली भाजी ठाण्यातील विविध विभागात विकली जाते, ही भाजी  ‍ पिकवण्यासाठी तसेच धुण्यासाठी सांडपाणी मिश्रीत पाण्याचा वापर केला जात आहे,  अशा पद्धतीने नागरिकांच्या जीवाशी खेळून भाज्यांची लागवड केली जात आहे, याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून कॅन्सर, पोटाचे विकार, मेंदूचे विकार या सारख्या दुर्धर आजारांना या भाज्या सेवन केल्यामुळे सामोरे जावे लागत आहे.

याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून याची कसून चौकशी करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य ‍विभागाला तसेच प्रत्येक प्रभाग समितीनिहाय असलेल्या सहाय्यक आयुक्तांना ‍दिले आहेत. अशा प्रकारे गलिच्छ ठिकाणी पिकविलेल्या भाज्यांची लागवड जे करीत असतील त्यांच्यावर कठोर पावले उचलून तातडीने कारवाई करण्याचे संकेतही महापौरांनी दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेचे पहिले कर्तव्य आहेत, नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या व अशा बेफिकीरपणे भाजीविकेत्यांवर कारवाई करण्याबाबत महापालिकेने कोणतीही कसूर करु नये अशा सूचनाही महापौरांनी  प्रशासनाला दिल्या आहेत.