अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापावर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:36 IST2018-05-18T22:36:59+5:302018-05-18T22:36:59+5:30

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापावर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई
भिवंडी : गेल्या महिन्यापासून आपल्याच घरांत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या बापा विरोधात मुलीच्या आईने पोलीसांत तक्रार केली असता पोलीसांनी अत्याचारी बापावर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
शकील अहमद अन्सारी(४१) असे बापाचे नांव असून तो फातीया नगरमध्ये फातीया मजीदजवळ रहात आहे.तर त्याची पत्नी अबीदा शकील अन्सारी(३५) ही फैय्याद बिल्डींग,गैबीनगर येथे आपल्या आईवडीला बरोबर रहात आहे.दोघे वेगवेगळे रहात असल्याचा फायदा उचलीत शकीलने आपल्या घरांत रहाणा-या १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यास सुरूवात केली.गेल्या महिन्यापासून तिच्यावर अत्याचार सुरू होता. काल गुरूवार रोजी आपल्या आईकडे पोहोचल्यानंतर तीने ही हकीकत सांगीतली.त्यावरून अबीदा अन्सारी हिने शांतीगनर पोलीस ठाण्यात आपला पती शकील अहमद अन्सारी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी शकीलवर बलात्कार कायद्यासह पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.शहरात नवीन कायद्यानुसार ही पहिलीच कारवाई असल्याने सर्वांचे लक्ष या कारवाईकडे लागले आहे.