शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

दिवा, कळवा आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 27, 2023 18:53 IST

खान कम्पाऊंड, मुंब्रा देवी कॉलनी, शास्त्रीनगर, बाळकूम आणि कोलशेत येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.

ठाणे : ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत बुधवारी दिवा, कळवा आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या क्षेत्रात कारवाई करण्यात आली. खान कम्पाऊंड, मुंब्रा देवी कॉलनी, शास्त्रीनगर, बाळकूम आणि कोलशेत येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.            अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार बुधवारीही कारवाई करण्यात आली. या कारवाईत, दिवा प्रभाग समितीतील खान कम्पाऊंड येथे तळ आणि पहिल्या मजल्याचे सुमारे २५०० चौ. फूटाचे बांधकाम पाडण्यात आले. त्याच भागात, तळ आणि दोन मजले असलेले सुमारे ३००० चौ. फूटांचे आरसीसी बांधकाम पाडण्यात आले. यात तळमजल्यावरील आठ दुकानेही रिक्त करण्यात आली. याशिवाय, २००० चौ. फूटांचे प्लिंथपर्यंतचे आरसीसी बांधकाम तसेच, ४००० चौ. फूटांचे प्लिंथपर्यंतेच आरसीसी बांधकामही पाडण्यात आले. या संपूर्ण कारवाईसाठी तीन पोकलेन, एक जेसीबी, ४० कामगार आणि पोलिस व महापालिकेचे सुरक्षा रक्षक यांचे सहाय्य घेण्यात आले. 

याच प्रभाग समितीतील मुंब्रा देवी कॉलनी येथील सुमारे ४० कॉलम असलेले आरसीसी प्लिंथचे बांधकाम आणि २५ कॉलम असलेले आणखी एक आरसीसी प्लिंथचे बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईसाठी दोन जेसीबी, ३० कामगार आणि पोलिस व महापालिकेचे सुरक्षा रक्षक यांचे सहाय्य घेण्यात आले. कळवा प्रभाग समिती क्षेत्रात, प्रमिला हॉस्पिटलच्या मागे शास्त्रीनगर येथे सुमारे २००० फूटांचे आरसीसी प्लिंथपर्यंतेच बांधकाम दोन जेसीबी, ३० कामगार यांच्या सहाय्याने पाडण्यात आले. माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात, बाळकूम पाडा नं. १ जोशी आळी येथील आठव्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. तर, कोलशेत येथे मरियाई नगरमधील चाळीतील दोन बैठ्या खोल्यांचे बांधकाम पाडण्यात आले. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका