उल्हासनगरातील पदपथ अतिक्रमण मुक्त महापालिकेची कारवाई, ४७ हजाराचा दंड वसूल
By सदानंद नाईक | Updated: October 27, 2023 19:46 IST2023-10-27T19:43:25+5:302023-10-27T19:46:57+5:30
Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील पदपथ, चौक व रस्त्यावरील अतिक्रमणवर महापालिकेने धडक करवाई केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली, तसेच कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत लेंगरेकर यांनी दिले.

उल्हासनगरातील पदपथ अतिक्रमण मुक्त महापालिकेची कारवाई, ४७ हजाराचा दंड वसूल
- सदानंद नाईक
उल्हासनगर - शहरातील पदपथ, चौक व रस्त्यावरील अतिक्रमणवर महापालिकेने धडक करवाई केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली, तसेच कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत लेंगरेकर यांनी दिले.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते, चौक, सर्व्हिससेंटर व पदपथावरील अतिक्रमणावर आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गणेश शिंपी, जेठानंद करमचंदानी यांच्या पथकाने धडक कारवाई केली केली.
सहायक आयुक्त व अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांनी रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणेसाठी विशेष मोहिम हाती घेतल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथावर दुकानदार व सेंटरवाल्यानी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले आहे. तसेच रस्ते फेरीवाला मुक्त करण्यात आले असून या विशेष मोहिमेत दंडात्मक करावाई पोटी ४४ हजाराचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे.
उल्हासनगर महापालिकेतील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ यावर दुकानदार, सर्व्हिस सेंटर व गॅरेजवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणावर महापालिके मार्फत धडक कारवाई सुरु ठेवण्याचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले. ऐन दिवाळी सणापूर्वी महापालिकेच्या कारवाईची चर्चा होत असून कारवाईने अतिक्रमण करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.