डोंबिवलीत धडक कारवाई
By Admin | Updated: February 21, 2016 02:46 IST2016-02-21T02:46:33+5:302016-02-21T02:46:33+5:30
गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला वेग आला आहे. महिनाभराआधी कल्याणमध्ये, तर शनिवारी डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकालगतच्या टपऱ्यांवर

डोंबिवलीत धडक कारवाई
डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला वेग आला आहे. महिनाभराआधी कल्याणमध्ये, तर शनिवारी डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकालगतच्या टपऱ्यांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. त्यात एकूण ९५ पैकी ९१ टपऱ्यांवर पाडकाम कारवाई झाली. तर, अन्य ४ जणांनी स्टे घेतला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ही तत्काळ कारवाई केल्याचे ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी सांगितले.
शनिवार सकाळपासून ती सुरू झाली. संध्याकाळपर्यंत ते काम सुरू होते. त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी लहू वाघमारे, मधू शिंदे, व्ही. वानखेडे आदींसह अभियंता प्रशांत भुजबळ, उपअभियंता योगेंद्र राठोड, महापालिकेचे इस्टेट मॅनेजर गणेश बोऱ्हाडे आदींसह २०० कर्मचारी, ४ जेसीबी आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी आदींनी ही कारवाई यशस्वी केली.
पश्चिमेच्या म. गांधी रोडवर ती झाली. सकाळी ११ पासून संध्याकाळी उशिरापर्यंत ते पाडकाम सुरू होते. नागरिकांनीही या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले. बघ्यांच्या गर्दीमुळे काही वेळ या कामात अडथळा निर्माण झाला होता.
परंतु, अल्पावधीतच गर्दीला आवाहन केल्यानंतर सर्वांनी सहकार्य केले.
अनेक वर्षांनी डोंबिवली शहराच्या पश्चिमेला अनधिकृत बांधकामविरोधात मोठ्या
प्रमाणावर पहिल्यांदाच कारवाई झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा
होती. या सर्व टपऱ्या अनधिकृतच होत्या, असेही कारवाई पथकातील प्रमुखाने स्पष्ट केले. या कारवाईने नागरीकात समाधान व्यक्त होत आहे.