शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात बारवर बुलडोझर, नौपाड्यातील तीन, उपवन येथील एका बारवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 18:22 IST

ठाणे - महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर यांच्यावर तीन दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आज नौपाड्यातील तीन आणि उपवन येथील एका बारवर जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये नौपाडा प्रभाग समितीमधील शिल्पा, अॅंटीक पॅलेस, पुष्पा विहार तर उपवन येथील सूर संगीत बारवर ...

ठाणे - महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर यांच्यावर तीन दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आज नौपाड्यातील तीन आणि उपवन येथील एका बारवर जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये नौपाडा प्रभाग समितीमधील शिल्पा, अॅंटीक पॅलेस, पुष्पा विहार तर उपवन येथील सूर संगीत बारवर कारवाई करण्यात आली. दरम्यान कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर्सना अग्निशमन विभाग, शहर विकास विभाग आणि ३७६(अ) अन्वये नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली.           आज सकाळपासून पोलिस बंदोबस्तात आराधना टाॅकीज समोरील तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम असलेल्या शिल्पा बारवर कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाने शिल्पा बारमधील बोकायदा करण्यात आलेले त्याचप्रमाणे अंतर्गत बदल करून केलेले बांधकामही तोडून टाकण्यात आले.त्यानंतर तीन पेट्रोल पंप येथील बहुचर्चित ॲंटीक पॅलेस बारवर अतिक्रमण विभागाने आपला मोर्चा वळविला. तळ अधिक १ मजली बांधकाम असलेल्या या बारमधील कारवाईत टेरेसवर बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड, आणि अंतर्गत फेरबदल करून मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले सर्व बांधकाम, फर्निचर तोडून टाकण्यात आले.  त्याचबरोबर वंजना टाॅकीज येथील पुष्पा विहार बारवर कारवाई करून विनापरवाना केलेले अंतर्गत बांधकाम तोडण्यात आले. दरम्यान कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर्सना नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली. त्याचबरोबर उपवन येथील सूर संगीत बारवरही कारवाई करण्यात आली.  सदरची कारवाई उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त मारूती गायकवाड, डाॅ. चारूशीला पंडीत यांनी पोलिस बंदोबस्तात पार पाडली. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका