शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन काळात उभी राहिलेली बेकायदा बांधकामे तातडीने जमीनदोस्त करा. ...

ठळक मुद्दे अतिरिक्त आयुक्तांचा इशाराफेरीवाल्यांवरील कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन काळात उभी राहिलेली बेकायदा बांधकामे तातडीने जमीनदोस्त करा. त्याचबरोबर नवीन बेकायदा बांधकामे निर्माण होऊ देऊ नका. फेरीवाल्यांवरील कारवाई सुरूच ठेवा, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी बुधवारी अतिक्रमण विभागाच्या बैठकीमध्ये दिले. बेकायदा बांधकाम आणि फेरीवाल्यांना अभय दिल्याचे आढळले तर संबंधित सहायक आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.कोरोना काळात शहरात उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांमुळे टीका होऊ लागल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अशा बांधकामांवर कारवाई सुरू केली. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दबाब झुगारून सातत्याने कारवाई सुरू आहे. शहरातील रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधातही कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईदरम्यान सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला करणारा फेरीवाला असला तरी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठीच हा हल्ला घडवून आणल्याचा दावा पिंपळे यांनी केला होता. महापालिका सर्वसाधारण सभेत यावर चर्चा झाली होती. त्यावेळी फेरीवाले, अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले होते. शहरातील अशा कारवाईचा आढावा घेण्यासाठी हेरवाडे यांनी बुधवारी पालिकेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्व सहायक आयुक्त, बीट निरीक्षक आणि अभियंते उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाhawkersफेरीवाले