अवैध बांधकामावरील कारवाईने दणाणले धाबे, उल्हासनगरात अनाधिकृत गाळ्यावर पाडकाम कारवाई
By सदानंद नाईक | Updated: April 30, 2025 20:40 IST2025-04-30T20:40:12+5:302025-04-30T20:40:39+5:30
गाळ्याला महापालिकेने नोटीस देऊनही बांधकाम सुरु ठेवल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

अवैध बांधकामावरील कारवाईने दणाणले धाबे, उल्हासनगरात अनाधिकृत गाळ्यावर पाडकाम कारवाई
उल्हासनगर : कॅम्प नं-३, आझादनगर येथील अनाधिकृत ६ पेक्षा जास्त गाळ्यावर मंगळवारी पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई केली. गाळ्याला महापालिकेने नोटीस देऊनही बांधकाम सुरु ठेवल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगरातील शिरू चौकातील आरसीसीच्या अवैध बांधकामावर पोलीस संरक्षणात सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात पाडकाम कारवाई केली होती. त्यापूर्वी कॅम्प नं-५ येथील व्यापारी गाळ्यावर पाडकाम कारवाई झाली. कॅम्प नं-२, आझादनगर येथे विनापरवाना ६ पेक्षा जास्त व्यापारी गाळे बांधण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मनिष हिवरे यांनं मिळाल्यावर, त्यांनी गाळयाला नोटीस देऊन काम बंद करण्याचे सुचविले होते. मात्र भुमाफीयांनी नोटीसीला केरांची टोपली दाखविली. अखेर पोलीस संरक्षण मिळताच सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने जेसीबी मशीनने मंगळवारी गाळ्यात पाडकाम कारवाई केली. महापालिकेच्या या पाडकाम कारवाईने भुमाफीयाचे धाबे दणाणले असून अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले.
शहरात विविध राजकीय नेत्याचे कार्यकर्ते व माजी नगरसेवकांचे सेवक अवैध बांधकामाकडे वळल्याचे चित्र शहरांत आहे. कॅम्प नं-२, धोबीघाट म्हारळ नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्या शेजारी आरसीसी बंगलो व व्यापारी गाळ्यावर कारवाई कधी? असा प्रश्न यानिमित्ताने स्थानिक नागरिकांनी केला आहे.