विनामास्क साडेचार हजार जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:34+5:302021-06-05T04:28:34+5:30
----- कोरोनाने २२ जणांचा मृत्यू कल्याण : कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी नव्या १३९ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णालयात दाखल असलेले १०२ ...

विनामास्क साडेचार हजार जणांवर कारवाई
-----
कोरोनाने २२ जणांचा मृत्यू
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारी नव्या १३९ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णालयात दाखल असलेले १०२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर २२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सद्य:स्थितीला एक हजार ७९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजमितीला केडीएमसीच्या हद्दीत एक लाख ३३ हजार ६४६ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत दोन हजार ९३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक लाख २९ हजार ७५४ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
----
जीवे मारण्याची धमकी
डोंबिवली : लोढा पलावा येथे राहणारे आनंदकुमार दुबे यांच्याबरोबर मुंबईतील शीव येथे राहणारे अनिल उपाध्याय, दीपक उपाध्याय आणि राज उपाध्याय या तिघांचा अमरावती पेट्रोलपंपावरून गेले महिनाभर वाद सुरू आहे. यात उपाध्याय यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असताना दुबे यांनीही आपल्याला आणि आपल्या भावांना शिवीगाळ आणि मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार अनिल उपाध्याय यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. यावरून दुबे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------------