खाडीकिनारी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:39+5:302021-05-25T04:45:39+5:30
कल्याण-डोंबिवलीत रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांमधील बेफिकिरी पुन्हा वाढू लागली आहे. रविवारी अनेक डोंबिवलीकर सहकुटुंब खाडीकिनारी फिरायला गेल्याचे चित्र ...

खाडीकिनारी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई
कल्याण-डोंबिवलीत रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांमधील बेफिकिरी पुन्हा वाढू लागली आहे. रविवारी अनेक डोंबिवलीकर सहकुटुंब खाडीकिनारी फिरायला गेल्याचे चित्र दिसले. सोमवारीही अनेकांनी खाडीकिनारी फेरफटका मारला. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांकरिता रेल्वेसेवा बंद असल्याने अनेकजण वर्क फ्रॉम होम करीत आहेत. मॉल, हॉटेल्स बंद असल्याने रविवारी किंवा अन्य दिवशीही कुठे फेरफटका मारायचा, अशी घालमेल डोंबिवलीकरांची होत असते. अनेक डोंबिवलीकर फिरायला ठाण्यातील मॉलमध्ये जातात. परंतु, ती सोय नसल्याने मोठागाव येथील खाडीकिनारी काहींनी आपला मोर्चा वळविला. अल्पावधीत खाडीकिनारी शेकडो लोक जमा झाल्याने पोलीस व महापालिका यांची धावपळ उडाली. अनेकांचे मास्क हनुवटीपर्यंत खाली उतरले होते, तर काहींनी मास्क काढून टाकले होते. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खाडीकिनारी जमलेल्यांना गोळा करून कोरोनानियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
.............
वाचली
-------------