शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीतील 1686 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई, अप्पर पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 18:24 IST

वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावित असताना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात महिला पोलिसाला रिक्षा चालकाने फरफटत नेले होते. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती.

कल्याण - वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावित असताना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात महिला पोलिसाला रिक्षा चालकाने फरफटत नेले होते. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती. या घटनेपश्चात वाहतूक पोलिस, आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण पोलिसांनी रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाईचा फास आवळला. 12 ऑक्टोबरपासून बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली. आत्तार्पयत 1 हजार 686 रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली आहे असल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली आहे.     बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात ज्येष्ठ नागरीकांसह, अन्य प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनेकदा प्रवासी भाडे नाकारले जाते. उद्धट वर्तन केले जाते. बेशिस्त वर्तन करुन प्रवाशाना नाहक त्रस दिला जातो. वेठिस धरले जाते. हे सगळे प्रकार घडत असताना त्याच पाश्र्वभूमीवर महिला पोलिसाला फरफटत नेण्याची घटना घडली. या घटनेनंतर धडक मोहिम सुरु झाली. कल्याण डोंबिवलीसह आरटीओ परिक्षेत्रतील अन्य शहरातही पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात मोहिम सुरु केली. 12 ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या या कारवाई मोहिमेमध्ये आत्तार्पयत 1 हजार 686 रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली आहे. यापूढेही ही कारवाई अधिक गतीमान केली जाईल. तीव्रतेने राबविली जाईल. बेशिस्त रिक्षा चालकाचे परमीट, बॅच जप्त करुन रिक्षाही जप्त केली जाईल असे दिघावकर यांनी सांगितले.     बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. गेल्या आठ दिवसात कारवाईचा आकडा 1 हजार 686 इतका झाला आहे. कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे. कारवाईत आरटीओ अधिकारी संजय ससाणो यांनी अधिक पुढाकार घेतला आहे. चौकट-कल्याण स्टेशन परिसरात बेशिस्त सुरुचकारवाईची जोरदार सुरु असली तरी आजही कल्याण स्टेशन परिसरात दिपक हॉटेल परिसर, बस डेपो या ठिकाणावरुन रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी करुन बेकायदेशीर रित्या भाडे भरले जाते. त्यामुळे स्टॅण्डमधील रिक्षा चालकाना प्रवाशी मिळत नाही. साईड भाडे मारणा:या रिक्षा चालकामुळे स्टेशन परिसरातील बस स्टॅण्डवर बस उभी करण्यास परिवहनच्या बस चालकाना जागा नसते. त्यामुळे त्यांच्याकडून आडवी तिडवी बस लावली जाते. या सगळ्य़ा प्रकारामुळे वाहतूक कोंडीत भरच पडते.  

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली