उल्हासनगर : महापालिकेने व्यापाऱ्यांसह स्थानिक नेत्यांचा विरोध झुगारून १७ सेक्शन येथून कल्याण-कर्जत रस्त्याचे रुंदीकरण सुरू केले आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी ४० पेक्षा जास्त दुकानांवर कारवाई करण्यात आली. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी विरोध करीत मार्केट बंद केले होते, मात्र नंतर पोलीस बंदोबस्त पाहून त्यांनी नमते घेतले.उल्हासनगरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम एमएमआरडीएने ३ वर्षांपूर्वी सुरू केले. १०० ऐवजी ८० फुटांचे रुंदीकरण करण्याची मागणी पालिकेसह शासनाकडे व्यापाऱ्यांनी केली होती. तसा प्रस्ताव स्थानिक नेत्यांनी महासभेत मंजूर करून शासनाकडे पाठविला. १०० फुटांच्या रुंदीकरणामुळे ८२१ दुकाने बाधित होणार असून २५० पेक्षा जास्त दुकाने पूर्णत: तोडली जाणार असल्याचे निवेदनात म्हटले होते.राज्य रस्ता रुंदीकरणाचे आदेश दिले. पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त मागवला होता. स्थानिक नेते, व्यापारी संघटना, व्यापारी यांच्या विरोधाला न जुमानता शुक्रवारी रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. कारवाईच्या आदल्या दिवशी उपायुक्त नितीन कापडनीस, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी २०० पालिका कर्मचाऱ्यांसह कर्जत-कल्याण रस्त्यावरून संचलन केले. त्यामुळे व्यापाऱ्यांत दहशत निर्माण होऊन त्यांचा विरोध मावळला.
पहिल्या दिवशी ४० दुकानांवर कारवाई
By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST