शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कांदळवनात भराव टाकणाऱ्या 3 डंपरवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 20:03 IST

गुन्हा दाखल करण्यासाठी दिला प्रस्ताव  

मीरारोड -  मीरारोड मधील कांदळवन क्षेत्रात भराव करणाऱ्या 3 डंपरवर महसूल विभागाच्या तलाठ्याने कारवाई केली आहे. सुमारे 62 हजार रुपयांचा दंड वसूल केला असून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. 

मीरारोडच्या हटकेश भागातील पालिका पाण्याची टाकी व नेमिनाथ हाईट्स मागे मोठ्या प्रमाणात कांदळवन, सीआरझेड क्षेत्रात बेकायदा माती भराव झालेला आहे. या प्रकरणात काही गुन्हे सुद्धा महसूल विभागाने दाखल केले आहेत. भराव करून कच्ची व पक्की बांधकामे केली जात आहेत. परंतु अद्यापही सदर भराव काढून पूर्वस्थिती निर्माण करण्यास तसेच कांदळवन वन विभागा कडे हस्तांतरित करण्यास शासनाची चालढकल सुरु आहे. पालिका सुद्धा ठोस कारवाई करत नाही. 

दिवस रात्र या भागात बेकायदा माती व डेब्रिस चा भराव सुरु असताना महापालिका व स्थानिक पोलीस मात्र स्वतःहून कारवाई न करता पर्यावरण ऱ्हासाला खतपाणी घालत आहेत. पालिकेची तर माती भराव पथकं असूनही कारवाई होत नाही. तर अपुरं मनुष्यबळ असताना महसूल विभागा कडून तक्रार आल्यास कारवाई केली जाते. 

सदर ठिकाणी माती भराव सुरु असल्याची तक्रार मिळताच तलाठी अभिजित बोडके यांनी वरिष्ठांच्या आदेशा नुसार पोलिसांच्या सहकार्याने घटना स्थळावर भराव करताना तीन डंपर पकडले. यावेळी एक जेसीबी सुद्धा आढळला. डंपर चालका कडून सुमारे 62 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय.  शिवाय कांदळवनात भराव केल्याप्रकरणी पंचनामा तयार करून गुन्हा दाखल करण्यासाठी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आल्याचे बोडके यांनी सांगितले. 

या कारवाईमुळे महापालिकेचे पितळ उघडे पडले असून पालिका आयुक्तांपासून अधिकाऱ्यांना येथे चालत असलेल्या भरावाची कल्पना असताना देखील कारवाई केली गेली नाही.

टॅग्स :mira roadमीरा रोडdumpingकचरा