Acting Katta in Thane and Rotary Club of Thane organized 'Smart Baby Competition' superhit | ठाण्यातील अभिनय कट्टा आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे आयोजित 'स्मार्ट बेबी प्रतियोगीता' सुपरहिट
ठाण्यातील अभिनय कट्टा आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे आयोजित 'स्मार्ट बेबी प्रतियोगीता' सुपरहिट

ठळक मुद्दे 'स्मार्ट बेबी प्रतियोगीता' सुपरहिटबालदिनाचे औचित्य साधून  आयोजित वय वर्षे २ ते वय वर्ष ७ दरम्यान च्या मुलांमध्ये ही स्पर्धा तीन गटात

ठाणे : आजकालची मूल तितकीच जबरदस्त, अशाच मुलांच्या प्रतिभेला वाव मिळावा आणि त्यांच्यातील त्या प्रतिभेला ह्या कोवळ्या वयातच प्रोत्साहान मिळावं ह्या हेतूनेच अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे अध्यक्ष अच्युत दामले ह्यांच्या संकल्पनेतून बालदिनाचे औचित्य साधून  स्मार्ट बेबी प्रतियोगीता अभिनय कट्टा आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

    वय वर्षे २ ते वय वर्ष ७ दरम्यान च्या मुलांमध्ये ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली होती.मुलांच्या विविध प्रतिभशक्तीची चुणूक दाखवणारे विडिओ ह्या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून मागवण्यात आले होते.सादर स्पर्धेला महाराष्ट्भरातून जबरदस्त प्रतिसाद मिळाला.कुणाचे पाठांतर जबरदस्त कुणाचा अभिनय कुणाचं वादन तर कुणाचं गायन कुणी खेळात जबरदस्त कुणी गप्पा गोष्टीत   एकापेक्षा एक सरस स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला.सदर *स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ अभिनेत्री,शिक्षिका सुषमा रेगे,माधुरी कोळी आणि राजश्री गढीकर ह्यांनी केले.* प्रत्येक स्पर्धकांचे परीक्षण करताना आम्ही देखील खूप काही शिकत होतो असे मत परीक्षकांनी व्यक्त केले.सदर स्पर्धेत *वयोगट २ ते ३ वर्षे गटात स्पृहा आरेकर(प्रथम),आरवी चोरगे(द्वितीय),मुक्ता मगम(तृतीय); वयोगट ३ ते ४ वर्षे गटात श्लोक भोसले(प्रथम),सई पिलगार(द्वितीय); वयोगट ४ ते ७ वर्षे गटात निया पवार(प्रथम),भैरवी जोशी(द्वितीय),आयाम पंडागळे(तृतीय),देवांशी पवार(चतुर्थ),अनया चोरगे (उत्तेजनार्थ) , श्राव्या कोचरेकर (विशेष पारितोषिक) याना पारितोषिक मिळाले.* सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.ह्यावेळी ह्या चिमुरड्यांचा उत्साह आणि पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद जबरदस्त होता.मुलांच्या प्रतिभाशक्तीला अशी दाद आणि प्रोत्साहन मिळाल्यामुळे सर्व पालकांनी आयोजकांचे आभार मानले. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा त्याला योग्य आकार मिळणं गरजेचं आणि जडणघडणीच्या वयात मुलांच्यात सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळण गरजेचं असत आणि ह्या मुलांच्या भविष्यातील वाटचालीत ही प्रतियोगीता नक्कीच कारणीभूत ठरू शकते असे मत रोटरी क्लब ऑफ ठाणे चे अध्यक्ष अच्युत दामले ह्यांनी व्यक्त केले. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात लहान वयातच मूल एखाद्या कलेत पारंगत होताना दिसतात त्यांच्यातील एखाद्या विष्यामधील चुणूक किंवा त्यांच्यातील प्रतिभा ही ओळखणं गरजेचं आहे तिला योग्य मार्गदर्शन मिळन गरजेचं आजच्या मुलांमध्ये ह्या वयामधील जो उत्साह आणि ऊर्जा आहे तिला योग्य दिशा मिळावी आणि कुठेतरी त्यांच्यातील हुशारीला शाबासकी द्यावी जेणेकरून त्यांची पुढची वाटचाल अजून जबरदस्त होईल ह्याच संकल्पनेतून आम्ही ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. सादर कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार माधुरी कोळी ह्यांनी केले.

 

Web Title: Acting Katta in Thane and Rotary Club of Thane organized 'Smart Baby Competition' superhit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.