शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आचार्य अत्रे रंगमंदिर गणेशोत्सवानंतरच उघडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:21 IST

महापालिका प्रशासनाने दिलेली स्वातंत्र्यदिनाची डेडलाइनही हुकली

कल्याण : देखभाल-दुरुस्तीसाठी एप्रिल २०१७ पासून बंद असलेल्या शहरातील आचार्य अत्रे रंगमंदिराचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे नाट्यगृह स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्टला सुरू केले जाईल, असे सांगितले जात होते, परंतु ही डेडलाइनही हुकली आहे. आता सप्टेंबरमध्ये ते सुरू होईल, असा दावा केडीएमसी प्रशासनाने केला आहे. मात्र, सप्टेंबरच्या अखेरीस गणेशोत्सवानंतरच रंगमंदिराचा पडदा उघडला जाईल, अशी शक्यता आहे.केडीएमसीकडून दुरुस्तीसाठी नाट्यगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नव्हती. दुरुस्ती कामांच्या निविदेला योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे कामे सुरू व्हायला विलंब लागत होता. परिणामी कामांचे तीन भाग करण्यात आले आणि त्याप्रमाणे प्रत्येक कामांची स्वतंत्रपणे निविदा मागविली गेली. अखेर त्याला प्रतिसाद मिळाला.१३ एप्रिलच्या स्थायी समितीच्या सभेत या निविदा प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यावेळी सभापती राहुल दामले यांनी देखभाल दुरुस्तीच्या कामाला दिरंगाई करू नये, असे स्पष्ट केले होते. त्यावर लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जाईल, असा दावा शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी केला होता. साधारण आॅगस्टमध्ये हे काम पूर्ण होऊन रंगमंदिर १५ आॅगस्टला सुरू केले जाईल, असा दावा प्रशासनातर्फे केला जात होता. पण ही डेडलाइनही महापालिकेला पाळता आली नाही.दरम्यान, ९० टक्के काम झाले असून रंगरंगोटीचे बाकी आहे. सप्टेंबरमध्ये रंगमंदिर सुरू होईल, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके म्हणाले.ऐन सुटीत फुले कलामंदिर राहणार बंदअत्रे रंगमंदिराचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिराचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार नाही.जर सप्टेंबरमध्ये अत्रे रंगमंदिराचे काम पूर्ण झाले तरच ऐन आॅक्टोबर-नोव्हेंबर या सुटीच्या कालावधीत फुले कलामंदिर दुरुस्तीसाठी बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांची गैरसोय होणार आहे.गणेशोत्सवात कलाकारांची सुटीसप्टेंबरमध्ये गणेशोत्सव आहे. या कालावधीत कलाकार सुटी घेतात. त्यामुळे नाट्यप्रयोग बंद असतात. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच अत्रे रंगमंदिर सुरू होईल, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :kalyanकल्याण