शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

मृतांवर दाखल होणार गुन्हा, बुधवारी नातेवाईक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 5:53 AM

दिवा रेल्वे स्थानकात सोमवारी सेवाग्राम एक्स्प्रेसला धडक दिल्याने ठार झालेल्या त्या मयत दुचाकीस्वारांविरोधात भारतीय रेल्वे कायद्यान्वेय गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात सोमवारी सेवाग्राम एक्स्प्रेसला धडक दिल्याने ठार झालेल्या त्या मयत दुचाकीस्वारांविरोधात भारतीय रेल्वे कायद्यान्वेय गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, हा गुन्हा दिवा रेल्वे सुरक्षाबल की ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होणार, याबाबत अद्यापही दोन्ही पोलीस दलात संभ्रमाचे वातावरण आहे. या घटनेनंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दोघांचे नातेवाईक मंगळवारी आले नसल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत.मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले अंग्रेज चौधरी आणि रामचरण चौधरी यांची सोमवारी सकाळी ११ वाजता झालेल्या अपघातानंतर ओळख पुढे येण्यास जवळपास सायंकाळ झाली. त्यानंतर, त्या दोघांच्या नातेवाइकांना याबाबत माहिती देण्यात आली, तसेच त्यांचे नातेवाईक ठाण्याला येण्यास निघाले असून, ते बुधवारी येतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दोघे एकाच गावातील रहिवासी असून, या व्यतिरिक्त त्यांची अधिक माहिती कळू शकलेली नाही. तर, अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वारावर रेल्वे कायद्यानुसार, गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.>पुढील तपास होणार नाही...या अपघातानंतर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे, पण रेल्वे फाटक रेल्वे सुरक्षाबल पोलीस ठाण्यात येते. त्यामुळे गुन्हा दाखल करायचा, तर तो दिवा रेल्वे सुरक्षाबल की ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नाही. त्यातच, गुन्हा दाखल झाला, तरी यामध्ये आरोपी मयत असल्याने या प्रकरणी पुढील तपास करावा लागणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.