व्यापाऱ्यांची पैशाची बॅग घेऊन पळणारा जेरबंद

By सदानंद नाईक | Updated: March 1, 2024 19:02 IST2024-03-01T19:02:35+5:302024-03-01T19:02:46+5:30

पोलिसांनी २४ तासांत चोरट्याला जेरबंद केले आहे. 

Accused who ran away with a bag of traders money arrested | व्यापाऱ्यांची पैशाची बॅग घेऊन पळणारा जेरबंद

व्यापाऱ्यांची पैशाची बॅग घेऊन पळणारा जेरबंद

उल्हासनगर : कॅम्प नं-४ शिवनेरी परिसरात राहणारे व्यापारी देविदास चुग २ लाख ७० हजार रुपयांची बॅग घेऊन बुधवारी बँकेत जात होते. यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने बॅग हिसकावून पोबारा केला होता. विठ्ठलवाडी पोलिसांनी २४ तासात चोरट्याला जेरबंद केले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४, शिवनेरी हॉस्पिटल परिसरात देविदास चुहामल चुग हे व्यापारी राहतात. बुधवारी बॅगेत २ लाख ७० हजार रुपये घेऊन, ते बँकेत जमा करण्यासाठी जात होते. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या आरोपीने चुग यांच्या हातातील बॅग हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर, पोलिसांनी २४ तासात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोराला रोख रक्कमेसह जेरबंद केले असून त्याचे तानुद्दीन मेहलीन नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Accused who ran away with a bag of traders money arrested