म्हारळमध्ये गुन्हेगार वॉच पेट्रोलिंगमध्ये खूनातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:25 PM2021-01-10T23:25:19+5:302021-01-10T23:28:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ‘गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग’मध्ये एका खूनातील आरोपी संदीप दत्ताराम ...

Accused of murder arrested in criminal watch patrolling in Mharal | म्हारळमध्ये गुन्हेगार वॉच पेट्रोलिंगमध्ये खूनातील आरोपी जेरबंद

कल्याणच्या म्हारळ गावातून घेतले ताब्यात

Next
ठळक मुद्दे ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईकल्याणच्या म्हारळ गावातून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ‘गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग’मध्ये एका खूनातील आरोपी संदीप दत्ताराम कदम (४०) याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टाही हस्तगत केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी दिली.
ठाणे ग्रामीणमधील गुन्हयांना आळा बसण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अलिकडेच गुन्हेगार वॉच पेट्रोलिंगचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ डिसेंबर २०२० रोजी पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे यांचे पथक म्हारळ, वरप आणि कांबा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्याच वेळी या परिसरात एक व्यक्ती रिव्हॉल्व्हर बाळगून असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याचआधारे त्या भागात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या संदीप कदम याला या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचा गावठी कट्टा त्याच्याकडून जप्त करण्यात आला. त्याला विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीमध्ये त्याचा चुलत भाऊ संदीप सिताराम कदम (३६, रा. म्हारळगाव, कल्याण) याचा खून राजेश भांडवलकर (३१, रा. साकीनाका, मुंबई) याच्या मदतीने केल्याची कबूली दिली.
* सखोल चौकशीमध्ये पूर्व वैमनस्यातून गाडी भाडयाने पाहिजे, असा बहाणा करीत संदीप सिताराम कदम याचे २० डिसेंबर २०२० रोजी त्याच्या मोटारकारसह या आरोपींनी अपहरण केले. त्यानंतर त्याला एका अज्ञात ठिकाणी नेऊन देशी बनावटीच्या गावठी कट्टयाने त्याचा खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तसेच त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह सातारा जिल्हयातील मांढरदेवी येथील गडावरील घाटाच्या कटयामध्ये खाली टाकला. ही माहिती मिळाल्यानंतर आरोपीविरुद्ध खून तसेच पुरावा नष्ट करणे तसेच आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, उपनिरीक्षक सुळे, पोलीस हवालदार महाले आदींच्या पथकाने हा खूनाचा गुन्हा उघडकीस आणला. या दोन्ही गुन्हयांचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपी कदम याला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहे.

Web Title: Accused of murder arrested in criminal watch patrolling in Mharal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.