शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मायलेकांना शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 00:04 IST

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून धमकावून बेकायदेशीररित्या घरात डांबून ठेवणाऱ्या तिघा मायलेकांना ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश के डी शिरभाते यांनी गुरु वारी दोषी ठरवत वेगवेगळी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देठाणे न्यायालयाचा निर्णयअत्याचारी मुलाला सश्रम कारावासाची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून धमकावून बेकायदेशीररित्या घरात डांबून ठेवणाऱ्या तिघा मायलेकांना ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश के डी शिरभाते यांनी गुरु वारी दोषी ठरवत वेगवेगळी शिक्षा सुनावली. यामध्ये अत्याचार करणाºया इशरत अन्सारी (२२, रा. भिवंडी) याला सात वर्षे सश्रम कारावासाची तर धमकावून घरात बेकायदेशीररित्या डांबल्याप्रकरणी त्याची आई निलोफर (६०) आणि भाऊ अर्शद अन्सारी (२५) अशा तिघांना प्रत्येकी एक हजार रु पये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी सुनावली आहे.भिवंडीतील ही १६ वर्षीय पिडित मुलगी तिच्या भावाकडे वास्तव्यासाठी आली होती. याच काळात २८ मार्च २०१८ रोजी ती दुकानात जात असताना, त्याच भागातील इशरत याने तिला त्याच्या घरात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिला मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर तिला घरात डांबून ठेवले. त्यानंतर घरी आलेल्या इशरतची आई निलोफर आणि भाऊ अर्शद यांना या पिडितेने आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यांनीही तिला धमकावून रात्रभर घरात डांबून ठेवले. दुसºया दिवशी सकाळी अर्शदने घरातून तिला बाहेर रस्त्यावर सोडले. त्यानंतर भावाच्या मदतीने तिने भोईवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्र ार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यावर सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. पुजारी यांच्या पथकाने तिघांनाही अटक केली. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर याच खटल्याची सुनावणी गुरुवारी झाली. विशेष पोक्सो न्यायाधीश शिरभाते यांच्यासमोर आठ साक्षीदारांची साक्ष आणि पुरावे ग्राह्य मानून यातील तिघांनाही वेगवेगळ्या कलमान्वये दोषी ठरविण्यात आले. यात अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी इशरत याला सात वर्ष सश्रम कारावासाची तसेच एक हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तर दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली. तसेच अन्य एका कलमात दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैकेची शिक्षा सुनावली आहे. तर इशरतला मदत करणाºया त्याची आई आणि भावालाही प्रत्येकी एक हजार दंड आणि तो न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकारी वकील संजय मोरे यांनी आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पुजारी यांनी तर न्यायालयीन कारकूनीचे काम पोलीस हेडकॉन्स्टेबल शेवाळे आणि तोटेवाड यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र