विनयभंगातील आरोपीने केला महिला पोलिसाचाही विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:46 IST2021-08-13T04:46:38+5:302021-08-13T04:46:38+5:30

ठाणे : विनयभंगातील आरोपी सादीक अन्सारी (३०, रा. भायखळा, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला कोपरी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने ...

Accused of molestation also molested a female police officer | विनयभंगातील आरोपीने केला महिला पोलिसाचाही विनयभंग

विनयभंगातील आरोपीने केला महिला पोलिसाचाही विनयभंग

ठाणे : विनयभंगातील आरोपी सादीक अन्सारी (३०, रा. भायखळा, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला कोपरी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने याच ठिकाणी तेथे असलेल्या एका महिला पोलिसाचाही विनयभंग केला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे यांच्यावर हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी कोपरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कोपरीतील एका १९ वर्षीय तरुणीचा सादीकने कोपरी भाजी मार्केट परिसरात विनयभंग केल्यामुळे त्याला ११ ऑगस्ट रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्या वेळी त्याने पोलीस ठाण्यात पुन्हा गोंधळ घालत तेथे असलेल्या एका महिला पोलिसाचा विनयभंग केला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे यांच्या कामात अडथळा आणून त्यांच्यावरही हल्ला केला. या धुमश्चक्रीमध्ये पठाणे यांच्या उजव्या हाताच्या बोटाचे हाड फ्रॅक्चर करून त्यांना गंभीर दुखापत केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून पठाणे यांनी सादिकला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक डी. टी. धोंडे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Accused of molestation also molested a female police officer