उल्हासनगर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी गजाआड

By सदानंद नाईक | Updated: November 28, 2023 19:19 IST2023-11-28T19:18:47+5:302023-11-28T19:19:23+5:30

अखेर सोमवारी कल्याण येथून पाटील याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयीन कस्टडी दिली आहे.

Accused Gajaad, who fled from Ulhasnagar police | उल्हासनगर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी गजाआड

उल्हासनगर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी गजाआड

सदानंद नाईक

उल्हासनगर : मोबाईल चोरी व हाणामारी प्रकरणी अटक केलेल्या विक्रम पाटील याला मेडिकलसाठी मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन जातांना पोलिसांच्या हातून निसटून पलायन केले होते. अखेर सोमवारी कल्याण येथून पाटील याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयीन कस्टडी दिली आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात विक्रम पाटील याने साथीदारांच्या मदतीने एका इसमाचा मोबाईल हिसकावून मारहाण केली होती. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून विक्रम पाटील याला दहा दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. पाटील याला मेडिकल करण्यासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पोलीस घेऊन गेले होते. त्यावेळी त्याने पोलिसांच्या हातून निसटून पलायन केले.

याप्रकाराने पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. अखेर सोमवारी कल्याण येथून उल्हासनगर पोलिसांनी विक्रम पाटील याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली. न्यायालयाने विक्रम पाटील याला न्यायालयीन कस्टडी दिली असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधिकारी फुलपगारे यांनी दिली आहे.

Web Title: Accused Gajaad, who fled from Ulhasnagar police