शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील तडीपार गुंडाला ठाण्यातून अटक: व्यावसायिकाची करणार होता हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:01 IST

पूर्ववैमनस्याचा वचपा काढण्यासाठी व्यापा-याच्या हत्येसाठी पिस्टल घेऊन आलेल्या तडीपार गुंडाला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकने अटक केली. त्याने २५ हजारांमध्ये उत्तरप्रदेशातून हे पिस्टल आणले होते.

ठळक मुद्देकाडतुसांसह पिस्टल हस्तगतठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाईउत्तरप्रदेशातून आणले होते पिस्टल

ठाणे: भांडूपमधील एका व्यावसायिकाची हत्या करण्याच्या बेतात असलेल्या संदेश भिरघुनाथ दुबे (२७, प्रतापनगर, भांडूप) या तडीपार गुंडाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्याला ५ मार्च २०१८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा भागात एक व्यक्ती एसटी डेपोकडे जाणा-या रस्त्यावर विनापरवाना बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे २८ फेब्रुवारी २०१८ रोजी ४.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक भागातून निरीक्षक शर्मा, राजकुमार कोथमिरे, विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश महाजन, संदेश गावंड, विकास बाबर, पोलीस नाईक रुपेश नरे, हेमंत महाले, महेश साबळे आणि नितिन ओवळेकर आदींच्या पथकाने सापळा रचून दुबे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्टल अग्नीशस्त्र आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खून, खूनाच्या प्रयत्नासह हाणामारीचे आठ ते दहा गुन्हे मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्याची भांडूप परिसरात दहशत असल्यामुळे त्याला मुंबई आणि ठाणे जिल्हयातून २०१६ पासून तडीपार करण्यात आले आहे. तरीही तो मोकाट फिरत होता.खूनाचा डावदुबे आणि भांडूपचा एक व्यावसायिक संजय सिंग याचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून सिंग याने दुबेला जबर मारहाण केली होती. दुबेच्या आईने यात मध्यस्थी करुनही तिलाही त्याने धक्काबुक्की करीत दुबेला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली होती. याच रागातून दुबे याने उत्तरप्रदेशातील जौनपूर येथून २५ हजारांमध्ये एक पिस्टल आणि काडतुसे आणली होती. या  पिस्टलने तो सिंगची हत्या करण्याच्या बेतात होता. तत्पूर्वीच तो ठाणे पोलिसांच्या जाळयात अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाMurderखून