नाशिकमध्ये तडीपार गुंडाने घरी येऊन वडिलांचा दाबला गळा;मद्यधुंद अवस्थेत आत्महत्येचाही प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 03:54 PM2017-11-16T15:54:01+5:302017-11-16T15:59:59+5:30

पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून त्याने वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी दखल घेऊन त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यास उपचारानंतर ताब्यात घेतले जाणार आहे.

The father tried to commit suicide due to drunkenness in Nashik. | नाशिकमध्ये तडीपार गुंडाने घरी येऊन वडिलांचा दाबला गळा;मद्यधुंद अवस्थेत आत्महत्येचाही प्रयत्न

नाशिकमध्ये तडीपार गुंडाने घरी येऊन वडिलांचा दाबला गळा;मद्यधुंद अवस्थेत आत्महत्येचाही प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देशिवीगाळ करून वडिलांचा गळा दाबला व आई-बहिणींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.स्वत:च्या अंगावर ब्लेडने जखमा करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्नपैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून त्याने वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड

नाशिक : पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या समीर निजामुद्दीन ऊर्फ सोनू शेख
(२७) यास फेब्रुवारी महिन्यापासून तडीपार करण्यात आले होते. सोनू याने वडाळागावातील जय मल्हार कॉलनीमधील त्याच्या राहत्या घरी येऊन बुधवारी (दि.१५) मद्यप्राशन करत धिंगाणा घातला. आई-वडिलांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने वडिलांचा गळा आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:च्या अंगावर ब्लेडने जखमा करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला अत्यवस्थ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनू शेख याने राहत्या घरी येऊन मद्यप्राशन केले आणि आई-वडिलांकडे पैशांचा तगादा लावला. पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून त्याने वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी दखल घेऊन त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यास उपचारानंतर ताब्यात घेतले जाणार आहे. सोनू शेख वडाळागाव येथील राहत्या घरातून सकाळी दहा वाजेच्या सुमारास बाहेर पडला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास मद्य प्राशन करून राहत्या घरी आला. त्याने पंधरा हजार रु पयांची मागणी केली. यावेळी आई-वडिलांनी नकार दिल्याने सोनू याने भाडेकरूंना दम देऊन डिपॉझिटचे पैसे मागितले, अन्यथा घरातून हुसकून देण्याची धमकी दिली. यावेळी आई-वडिलांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ करून वडिलांचा गळा दाबला व आई-बहिणींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बहिणीने पोलिसांना घेऊन येण्यास त्यांच्या नातेवाइकांना भ्रमणध्वनीवरून सांगितले असता त्याने त्याचा राग मनात धरून वडिलांचा गळा दाबला. आई-बहिणींनी वडिलांना त्याच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर शेख याने स्वत:च्या अंगावर ब्लेडने जखमा करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात निजामुद्दीन कासमअली शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा तडीपार मुलगा सोनूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The father tried to commit suicide due to drunkenness in Nashik.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.