मीरा रोड येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:41+5:302021-06-05T04:28:41+5:30

मीरा रोड : मीरा रोडच्या सृष्टी वसाहतीतील १९ वर्षीय अभिषेक सिंग याचा खून करून पसार झालेल्या दोन्ही सुरक्षा रक्षकांना ...

Accused arrested in murder of youth at Mira Road | मीरा रोड येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक

मीरा रोड येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक

मीरा रोड : मीरा रोडच्या सृष्टी वसाहतीतील १९ वर्षीय अभिषेक सिंग याचा खून करून पसार झालेल्या दोन्ही सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे.

अभिषेक सिंग हा २९ मे रोजी मध्यरात्री १२.३० वा. वसाहतीत परतला असता त्याचे सुरक्षा रक्षकांसोबत पूर्वीच्या वादातून भांडण सुरू झाले. त्यातूनच सुरक्षा रक्षक सुभाष बिजली पांडे व अमित तिवारी यांनी अभिषेकला मारहाण करून धारदार शस्त्राने वा. केले होते. त्यात अभिषेकचा मृत्यू झाला होता.

सहायक पोलीस आयुक्त विलास सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश भामरे, महेंद्र भामरे व प्रशांत गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक जावेद मुल्ला व काशीमीरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार आदींनी याप्रकरणी आरोपींना अटक केली आहे. सुभाष बिजली पांडे याला आधी अटक केली. मुख्य आरोपी अमित तिवारी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे तो जुहू, मुंबई येथे असल्याचे समजताच, त्याला ३ जून रोजी अटक करण्यात आली आहे. अमित तिवारीविरोधात २००५ मध्ये जुहू पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल असून, त्यात सात वर्षांची शिक्षा भोगून तो बाहेर आला होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title: Accused arrested in murder of youth at Mira Road